मेंढोली गावात अवैध दारूविक्रीला उधाण, गावकरी संतप्त

मेंढोली ग्रामपंचायतीचा अवैध दारु विक्री विरोधात ठराव

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत र्मेंढोली गावात अवैध दारु विक्री विरोधात ग्रामपंचायतीने ठराव मंजूर केला आहे. ठरावाच्या प्रतसह ग्रामपंचायत पदाधिकारी व महिला बचत गटाच्या महिलांनी शिरपूर ठाण्यात निवेदन देऊन अवैध दारु विक्रेत्यांवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे. मेंढोली हे गाव अवैध दारू विक्रीसाठी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली तेव्हापासूनच प्रकाशझोतात आहे. हा प्रकाशझोताला एका कर्मचा-याने लावलेले ‘दिवे’ कारणीभूत असल्याचेही बोलले जात आहे. 

पूर्वीपासूनच मेंढोली गावात मोठया प्रमाणात अवैध दारुची विक्री सुरू आहे. गावातच दारु मिळत असल्यामुळे अनेक तरुण व्यसनाधीन होत आहे. तर दारुमुळे गावात तंटे भांडणही वाढले आहे. मेंढोली गावात वार्ड नं. 1, 2 व 3 मध्ये अवैधरित्या देशी दारु विक्री चालू आहे. गावात अवैध दारु बंद करणे बाबत अनेकदा माहिती देऊनही पोलीस कारवाई करीत नसल्याचे अखेर गावकरी संतप्त झाले व त्यांनी थेट याविरोधात ठरावाच घेतला.

जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे अवैध दारूविक्री विरुद्ध कारवाई करण्याचे सक्त आदेश असताना शिरपूर ठाण्यातील एक कर्मचाऱ्याचे दारू तस्कराशी साटेलोटे असल्याने ही तस्करी असल्याचा गावकरी आरोप करीत आहे. वणी येथील काही दारू तस्कर पेटी मागे कमिशन ठेऊन गावातील विक्रेत्यांना घरपोच दारू विक्री साठी पोहचत आहेत. मेंढोली गावात 4 ते 5 दारू विक्रेते असून ते गावात अरेरावी करून रासरोजपणे दारू विक्री करीत आहे, असा गावक-यांचा आरोप आहे. या दारू विक्रेत्यांविरोधात कठोर कार्यवाही करुन मेंढोली गावात राजरोसपणे चालणारी दारु विक्री त्वरित बंद करावी अशी मागणी ग्रामपंचायत व महिलांनी केली आहे. 

ठाणेदारांना अंधारात ठेऊन ‘दिवे’ लावण्याचा प्रकार?
शिरपूर पो.स्टे.चे ठाणेदार पद सांभाळताच सपोनि गजानन करेवाड यांनी अवैध धंद्याविरोधात धडक कारवाईची सुरवात केली. कोंबड बाजार, अवैध दारु, रेती तस्करांवर अनेक गुन्हा दाखल करण्यात आले. मात्र पोलीस स्टेशनमधील एक कर्मचारी ठाणेदारांना अंधारात ठेवून चांगलेच ‘दिवे’ लावत असल्याचा आरोप होत आहे. जो खिसा गरम करतो अशा मर्जीतील व्यक्तींना मोकळीक आणि भाव न दिल्यास कारवाईचा बडगा या पोलीस कर्मचाऱ्यांकडून उगारल्या जात असल्याचा आरोप होत आहे. एकीकडे अवैध दारूविक्रीमुळे गावकरी त्रस्त आहे तर दुसरीकडे पक्षपाती कारवाईमुळे खिसा गरम न करणारे अवैध दारूविक्रेतेही त्रस्त, अशी विचित्र परिस्थिती मेंढोली गावाची झाली आहे. 

हे देखील वाचा:

आधी मीच राहणार आतला…. गर्भवती झाल्यावर मी नाही त्यातला…

धक्कादायक: अल्पवयीन मुलीची गळफास लावून आत्महत्या

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.