झरी तालुक्यात गॅस सिलेंडर, डिझल व पेट्रोल अवैधरित्या विक्री

घर, दुकान व पानटपरीवरून अवैध विक्री, प्रशासनाचा कानाडोळा...

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन, पाटण, झरी, गणेशपूर, पुरड व इतर गावात गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडर, पेट्रोल व डिझलची अवैधरित्या अधिक दराने विक्री होत आहे. तालुक्यात मुकुटबन सर्वात मोठी बाजारपेठ असून मुकुटबन सह परिसरात अधिकृत हजारो गॅस सिलेंडर धारक दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर व ट्रक आहे. शेकडो अनधिकृत गॅस सिलेंडर धारक सुद्धा आहे. मुकुटबन येथे काही दुकानदार अवैधरित्या गॅस सिलिंडरची विक्री करीत आहे.

अवैध गॅस सिलिंडर विक्रेते हे वेगवेगळ्या बोगस नावाने सिलिंडरची खरेदी 870 रुपयात करून सुमारे 1300 रुपयात विक्री करीत आहे. यामागे एक सिलेंडर मागे 300 ते 400 रुपये कमवून महिन्याकाठी लाखो रूपये कमवित आहे. मुकुटबन येथून दर महिन्याला 400 ते 500 अवैधरित्या सिलिंडरची विक्री केली जात असल्याचा अंदाज आहे.

दीपावली येताच सर्वांनीच मोठ्या प्रमाणात वड गॅस सिलेंडर साठा करून ठेवल्याची माहिती मिळत आहे. सिलेंडर गॅस विक्रेते हे अधिकृत विक्रेते नसून त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारचा परवाना नाही. मुकुटबन येथे 4 ते 5 अवैध सिलिंडर विक्रेते आहे. या विक्रेत्याजवळ कोणत्याही प्रकारचे गोडाऊन नाही. ते आपल्या दुकानात व घरात सिलिंडर ठेऊन विक्री करीत आहे. या विक्रेत्यामुळे बस स्टँड परिसरातील नागरिंकांचा जीव धोक्यात येऊ शकतो.

अवैधरित्या पेट्रोल व डिजेलची विक्रीही जोमात सुरू आहे. ही विक्री घरातून तसेच दुकान व पानटपरीवरून खुलेआम सुरू आहे. हा प्रकार मुकुटबन, पाटण व झरी सह तालक्यातील अनेक गावात सुरू आहे. या सर्व गोष्टीची माहिती पोलीस व महसूल विभागांना माहीती असूनही त्याकडे सदर विभाग कानाडोळा करत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अवैधरित्या गॅस सिलिंडर, पेट्रोल व डिजलची विक्री करणा-यांवर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

हे पण वाचा…

डिस्काउंटवाली दिवाळी साजरी करा मयूर मार्केटिंग सोबत

हे पण वाचा…

90 लाखांचं सोनं केलं परस्पर गहाळ

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.