अवैध रेतीसाठ्या प्रकरणी महसूल विभागाची कार्यवाही

'वणी बहुगुणी' इम्पॅक्ट: वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाला जाग

0

सुशील ओझा, झरी: शेतात रेतीची साठवणूक करण्यात आल्याची माहिती मिळताच महसूल विभागाने धाड टाकून २६ ब्रास रेतीसाठा जप्त केला आहे. ‘वणी बहुगुणी’ने याबाबत पोर्टलवर बातमी प्रकाशित केली होती. बातमी प्रकाशित होताच महसूल विभागाल जाग आली आणि यावर कार्यवाही करत रेतीसाठा जप्त केला.

तालुक्यात रेती चोरी करून तस्करीच्या प्रकरणात प्रचंड वाढ झाली आहे. रेती तस्कर कुणालाही न जुमानता दिवसरात्र खुलेआम रेती तस्करी करीत आहे. तालुक्यातील हिरापूर एकच रेतीघाट हर्रास झाला असून दुर्भा, पैनगंगा व खुनी नदीच्या पात्रातून सर्रास रेती तस्करी सुरू आहे. पैनगंगा व खुनी नदीच्या पाणी कमी असलेल्या पात्रातून रेती काढून नदी जवळील गावात व शेतात शेकडो ब्रास रेतीचे ढिगारे लावून लाखो रुपयांचा साठा जमा करून ठेवण्यात आला आहे.

याबाबत ‘वणी बहुगुणी’ने बातमी प्रकाशित करताच झोपेत असलेला महसूल विभाग जागा झाला. महसूलने हिरापूर गावजवळील शेतातील रेतीसाठा व गावतील रेतीसाठा जप्त केला. तर काही रेती तस्करांनी ज्यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे अशा लोकांच्या घरासमोर रेतीसाठा जमा केला होता. त्यामुळे तलाठी डेरे यांना अडचण निर्माण झाली होती. रेतीसाठा जप्त करण्यात आलेल्या रेतीचा जाहिरनामा काढून हर्रास करणार असल्याची माहिती तहसीलदार यांनी सांगितली.

येडसी, मुंजाला, कोसारा, परसोडा, धानोरा आदी नदी पात्र व नाल्यातील रेती चोरी करून ३ हजार ते ४ हजार रुपये प्रमाणे विक्री करून लाखो रुपये कमवीत आहे. तालुक्यात ४० ते ५० रेती तस्कर असून, बहुतांश राजकीय पुढारी आहे. तर उर्वरित राजकीय लोकांच्या हितसंबंधातील असल्याने महसूल विभागाला कारवाईस अडचण निर्माण होत आहे. दिवसा पांढरे कपडे घालून जनतेसमोर समाजसेवेचा आव आणणारेच रेतीची तस्करी करीत आहे.

चोराला साथ देणारा चोरच म्हणून संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरू आहे. काही वर्षांपूर्वी काही रेती तस्कराची एक वेळची जेवणाची व्यवस्था नव्हती. परंतू आज रेती चोरीतून धनाढ्य झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.