प्रशिक्षणाच्या नावाखाली वणीत बेकायदेशीररित्या गरब्याचे आयोजन

विचारणा करण्यासाठी गेलेल्या महिलांसोबत हुज्जतबाजी

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोनाची संभाव्य तिसरी लाटेच्या इशारामुळे राज्य शासनाने यंदाही नवरात्र उत्सवा दरम्यान होणा-या सार्वजनिक गरब्याच्या आयोजनावर बंदी आणली आहे. मात्र वणी येथे एस.बी. हॉलमध्ये गरबा प्रशिक्षणाच्या नावाखाली रात्री उशिरापर्यंत गरबा-दांडिया खेळ सुरु आहे. या खेळासाठी प्रत्येकी 300 रुपये तर कपल साठी 500 रुपये एन्ट्री फी देखील ठेवण्यात आली आहे. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या या गरब्याच्या आयोजनाला परवानगी कोणी दिली असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्राप्त माहितीनुसार येथील वरोरा रोडवरील एस.बी. हॉलमध्ये विना परवाना गरबा नृत्य सुरु असल्याची माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली होती. तेव्हा राकाँप महिला शहर अध्यक्ष सविता ठेपाले आणि विजया आगबत्तलवार यांनी रविवार 10 ऑक्टोबरला रात्री 8.30 वाजता जाऊन एस.बी. हॉलमध्ये भेट दिली. तिथे गरबा सुरु होता. तब्बल 70-80 महिला, मुली व लहान मुली हॉलमध्ये उपस्थित होत्या. कोणाच्याही तोंडावर मास्क नव्हते. आयोजकांकडून सॅनिटायझर, सोशल डिस्टनसिंग या कायद्याचे उल्लंघन केले जात होते.

उपस्थित तरुणांची महिलांसोबत हुज्जतबाजी
गरबा आयोजनाच्या परवानगी बाबत महिलांनी विचारणा केली असता तिथे उपस्थित एका तरुणाने दोघींसोबत उद्धट भाषेत हुज्जत घातली. त्यामुळे संतापलेल्या महिला शहर अध्यक्ष सविता ठेपाले यांनी त्या तरुणाच्या कानशिलात लावल्याची माहिती आहे. त्यानंतर फोन करुन पोलिसांना बेकायदेशीर गरब्याची माहिती देण्यात आली.

तब्बल 1 तासानंतर महिला पोलीस अधिकारी तिथं पोहचल्या. तो पर्यंत आयोजक गरबा बंद करून निघून गेले. शहरात सार्वजनिक गरबा आयोजनाची परवानगी कोणी दिली ? याबाबत पोलीस आणि प्रशासनिक अधिकारी बोलायला तयार नाही. त्यामुळे गरबा आयोजक कोणाच्या परवानगीवरून रात्री 10 वाजेपर्यंत गरबा खेळवत होते? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हे देखील वाचा:

वासनांध भास-याची नजर फिरली, नवरा नसला की यायचा घरी…

50 एकरची सोलर झटका मशिन अवघ्या 8490 रुपयांमध्ये

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये नवरात्री स्पेशल ‘बिग धमाका’ ऑफर लॉन्च

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.