आयपीएल सट्टा अड्ड्यावर धाड, चार जणांना अटक, तिघे फरार

8 लाख 48 हजराचा मुद्देमाल जप्त, तिघे फरार

जितेंद्र कोठारी, वणी: शहरालगत चिखलगाव येथे सुरू असलेल्या आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर सट्टा (बेटिंग) खेळणाऱ्या चार जणांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. तर मुख्य आरोपींसह उतारा घेणारे तिघे फरार आहे. अटक करण्यात आलेली आरोपीच्या ताब्यातून रोख 88 हजार रुपयांसह 7 मोबाइल, 1 चारचाकी, 1 दुचाकी आणि इतर साहित्य असा एकूण 8 लाख 48 हजार 515 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई 10 मे रोजी रात्री 10. 40 वाजताच्या सुमारास करण्यात आली.

Podar School 2025

दि. 10 मे रोजी आयपीएल 20-20 मालिकेत लखनऊ विरुद्ध गुजरात दरम्यान सुरू असलेल्या सामन्यावर बॅटिंग सुरू असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांना मिळाली होती. महितीवरून ठाणेदार महल्ले यांनी पोलीस स्टाफसह रात्री 10 वाजता चिखलगाव येथील खुराणा लेआऊटमध्ये अब्दुल छनील अ. शेख याच्या घरावर धाड टाकली. त्यावेळी एका खोलीत तीन इसम मोबाईलवर बेटिंग करताना आढळून आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पोलिसांनी आरोपी संदीप देवगडे, रा. चिखलगाव, सौरभ मेश्राम रा. वरोरा, शिवदास तडस रा. वरोरा व घरमालक अ. छनील अ. शेख याला ताब्यात घेतले. तर क्रिकेट सट्टा अड्डा चालविणारे तिघे फरार आहे.

ताब्यातील आरोपींकडून पोलिसांनी रोख 88 हजार, सुजूकी बलेनो कार क्र. (MH34 VV1013) किंमत 8 लाख 50 हजार, माईस्ट्रो स्कुटर क्र. (MH29 BG4272) किंमत 45 हजार रुपये तसेच इतर साहित्य असे एकूण 8 लाख 48 हजार 515 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक व फरार आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 4, 5 व सहकलम 109 भादंवि अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधीकारी संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले, पोउपनी प्रवीण हिरे, दीपक बोढे, विशाल गेडाम, शंकर चौधरी, अनिल मेश्राम यांनी पार पाडली.

हे देखील वाचा:

Comments are closed.