ईशान मिनरल्स कंपनीतर्फे अडेगावात हॅन्डवॉश केंद्र सुरू
युवा समाजसेवा ग्रुपच्या माध्यमातूनही मास्क वाटप
सुशील ओझा, झरी: संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या विळख्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून ठिकठिकाणी हँडवॉश केंद्र व मास्क वाटप केंद्र सुरू आहे. याच अनुषंगाने ईशान मिनरल्सचे सहायक प्रबंधक मनोज सिंग यांनी पुढाकार घेऊन अडेगाव येथे सार्वजनिक हँडवाश केंद्र उघडले आहे. दरम्यान स्थानिकांना मास्कचे ही वाटप करण्यात आले आहे.
अडेगाव येथील हॅन्डवॉश मुळे परिसरातील सिमेंट कम्पनी, डोलमाईट कंपनीत येणा-या लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे. मंगेश पाचभाई व गावक-यांनी कंपनीकडून हँडवाश केंद्र सुरूची मागणी केली होती, त्या अनुषंगाने कम्पनीने सीएसआर फंडमधून अडेगाव येथे हँडवाश केंद्र उपलब्ध करून दिले आहे.
ईशान मिनरल्सचे सहा प्रबंधक मनोज सिंग यांनी काही दिवसांपूर्वी कंपनीतर्फे मुकुटबन व अडेगाव येथील गोरगरीब व गरजू जनतेला भाजीपाला व दुधाचे वाटप केले व आता धान्य व किराणा वाटप करणार आहे. ईशान मिनरल कंपनी नेहमी आपत्तीच्या वेळी सर्वसामान्यांच्या पाठिशी उभी राहताना दिसत आहे. यावेळी युवा समाजसेवा ग्रुप चे सहकारी विलास देठे, गणेश बुरडकर, गणेश पेटकर, विजय लालसरे, संतोष पारखी, राहुल ठाकुर, दिनेश जीवतोड़े, सूरज डाहकी आदी सहकारी उपस्थित होते.