आदर्श महाविद्यालयात ‘जगू कविता: बघू कविता’ शनिवारी

0

बहुगुणी डेस्क, उमरेडः विदर्भातील ख्यातनाम कवी, गीतकार व निवेदक सुनील इंदुवामन ठाकरे यांचा ‘जगू कविता: बघू कविता’ हा कार्यक्रम नूतन आदर्श महाविद्यालयात आयोजित केला आहे. शनिवार 11 ऑगस्टला महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी 11 वाजता ठाकरे या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांसोबत ‘कविता आणि सकारात्मकता’ या विषयावर संवाद साधतील.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांनी वक्तृत्त्वकला कशी विकसित करावी, कार्यक्रमांचे निवेदन व सूत्रसंचालन कसे करावे यांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन ठाकरे करणार आहेत. महाविद्यालयातील विविध उपक्रमांचा भाग म्हणून प्राचार्य डॉ. अनंत बुरडकर यांनी हा उपक्रम घेतला. मराठी विभाग प्रा. विनोद मांडवकर यांच्यासह डॉ. विलास गजबे, डॉ. प्रशांत राऊत, प्रा. संजीव कोंडेकर यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.