मारेगाव सुनसान…. जनता कर्फ्लूला उत्स्फुर्त प्रतिसाद
व्यापा-यांचा पुढाकार, शहरातील 100% टक्के दुकाने बंद
नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोना मुक्त असलेल्या मारेगाव तालुक्यात अचानक कोरोनाचा उद्रेक वाढल्याने तालुक्यात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व साखळी खंडित करण्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्स या व्यापारी संघटनेने पुढाकार घेऊन शहरात गुरुवार ते रविवार असा चार दिवसाचा “जनता कर्फ्यू”चा निर्णय घेतला. जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी आज शहरातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून “जनता कर्फ्फुला” 100% प्रतिसाद दिला.
मारेगाव तालुक्यातील शासकीय कार्यालय व व्यापारी वर्गा सह तालुक्यातील गावखेड्यात सुध्दा कोरोनाने एन्ट्री केल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरणात निर्माण झाले आहे. त्यामुळे तेजीने वाढत असलेल्या कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी मेडिकल व दवाखाने वगळुन दिनांक 17 ते 20 सप्टेंबर या चार दिवसा करिता मारेगाव बंदचे आवाहन चेंबर्स ऑफ कॉमर्स या व्यापारी संघटने कडून करण्यात होते.
शहरातील बस स्टॅन्ड चौक, मार्डी चौक, घोंसा रोड, डॉ.आंबेडकर चौक, तसेच मेंन रोड वरील सर्व छोट्या मोठ्या मोठे दुकानदारांनी आज पहिल्याच दिवशी बंद ठेवली. त्यामुळे सर्वत्र “सूनसान गली, परेशान रोड” अनुभवास मिळाले. शहरातील व्यापाऱ्यां सह मारेगावातील जनतेने सुद्धा या उत्स्फुर्त जनता कर्फ्यूचे पालन केले.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)