मंदिरात कार्यक्रमासाठी गेलेल्या भाविकेची पोत लंपास

अज्ञात चोरट्याविरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: कार्यक्रमासाठी मंदिरात गेलेल्या एका भाविकेची पोत अज्ञात चोरट्याने लंपास केली. दत्त मंदिर समोर दिनांक 26 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत फिर्यादीची 20 ग्रॅम वजनाची पोत चोरट्याने लंपास केली. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Podar School 2025

फिर्यादी मंगला हंसराज रामटेके (40) या रामनगर चिखलगाव येथील रहिवासी असून त्या कुटुंबासह तेथे राहतात. त्या त्यांच्या पतीसह मंगळवारी दिनांक 26 डिसेंबर रोजी दत्त जयंती निमित्त वरोरा रोडवरील दत्त मंदिर येथे गेल्या होत्या. दत्त जयंती निमित्त मंदिरात विविध कार्यक्रम सुरु होते. मंदिरात गेट जवळ प्रसाद वाटप करणे सुरु होते. 2.30 वाजताच्या सुमारास मंदिरात गर्दी असल्याने त्या गेट जवळ प्रसाद घेण्यास थांबल्या होत्या.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दरम्यान त्यांच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट (पँडल) असलेली पोत त्यांना गळ्यात नसल्याचे लक्षात आले. (20 ग्रॅम किंमत 20 हजार) त्यांनी मंदिराच्या आसपास व परिसरात पोत शोधण्याचा प्रयत्न केला. पण ती त्यांना आढळली नाही. त्यांना अज्ञात इसमाने पोत चोरून नेल्याचे लक्षात आले.

त्यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 379 नुसार गु्न्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.