मुलाची 81 वर्षीय वृद्ध वडिलांना मारहाण

पाण्याची कॅन घेऊन जाणा-यास ऑटोचालकाची मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: पाण्याची कॅन घेऊन जाणा-या चालकाला एका ऑटोचालकाने मारहाण केली. ऑटो बाजूला घेण्यावरून झालेल्या वादातून लालगुडा येथे ही घटना घडली. दुसरी घटना ही पिंपरी कोलेरा येथील आहे. या घटनेत घरी झोपलेल्या वृद्ध वडिलास मुलाने मारहाण केली. या मारहाणीत वृद्ध जखमी झाला. सोमवारी रात्री ही घटना घडली.

पहिल्या घटनेतील फिर्यादी देवराव रामाजी देवळे (43) हे इंदिरा चौक वणी येथील रहिवासी आहे. ते एका पाण्याच्या कॅनच्या गाडीवर चालक म्हणून काम करतात. सोमवारी दिनांक 25 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता ते लालगुडा येथे एका चर्चमध्ये पाण्याची गाडी घेऊन कॅन देण्यासाठी जात होते. दरम्यान चर्चजवळ एक ऑटो रस्त्यात उभा होता. देवराव यांना गाडी काढण्यास अडचण जात असल्याने त्यांनी गाडीतून उतरून ऑटो चालकाला गाडी बाजूला घेण्यास सांगितले.

मात्र ऑटोचालकाने ऑटो बाजूला घेणार नाही असे सांगितले. त्यावरून वाद सुरु असताना ऑटोचालकाने शिविगाळ करत रस्त्याच्या बाजूला असलेला एका दगड उचलून देवराव यांच्या डोक्यात हाणला. त्यामुळे त्याचे डोके फुटले. यावेळी देवराव यांच्या गाडीत असलेला त्यांचा सहकारी मध्यस्थी करण्यास आला असता त्याला देखील ऑटोचालकाने शिविगाळ करीत दगड मारण्याचा प्रयत्न केला. झालेल्या प्रकारामुळे देवराव यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. ऑटोचालकाविरोधात भादंविच्या कलम 324, 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलाची 81 वर्षीय वृद्ध वडिलांना मारहाण
फिर्यादी हे 81 वर्षांचे असून ते तालुक्यातील पिंपरी (कोलेरा) येथील रहिवासी आहे ते त्यांची पत्नी व मुलासह (43) घऱी राहतात. त्यांचा मुलगा गेल्या 20 वर्षांपासून आजारी असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. सोमवारी दिनांक 25 डिसेंबरच्या रात्री 11.55 वाजताच्या सुमारास मुलगा काडी घेऊन आला व त्याने वडिलांना काठीने मारहाण केली. यात त्यांचे डोके फुटले. दुस-या दिवशी ते ग्रामीण रुग्णालयात आले. त्यांनी उपचार केला व वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात भादंविच्या कलम 324 नुसार गुन्हा दाखल केला.

हे देखील वाचा:

सावधान… ! वणी आणि परिसरात MLM/नेटवर्क बिजनेसचा सुळसुळाट

मंदिरात कार्यक्रमासाठी गेलेल्या भाविकेची पोत लंपास

29 डिसेंबरला T-10 चॅम्पियन लीगचा उद्घाटन सोहळा, गौतमी पाटील प्रमुख आकर्षण

Comments are closed.