जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक निवडणुकीत राजू येल्टीवार विजयी

तालुक्यातील महाविकास आघाडी गटात मोठा उत्साह

0

सुशील ओझा, झरी: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजू येल्टीवार यांचा दणदणीत विजय झाला. तालुक्यातील महाविकास आघाडी गटात मोठा जल्लोष करून विजय साजरा करण्यात आला.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचलकाकरिता भाजपाकडून अर्धवन येथील नरेंद्ररेड्डी बोदकुरवार तर महाविकास आघाडीकडून दिग्रस येथील राजू येल्टीवार उभे होते.

सुरवातीला प्रचारादरम्यान भाजपचे पारडे जड होते व १८ पैकी १६ मतदान भाजपलाच मिळणार असे चिन्ह दिसत होते. तर महाविकास आघाडीचे येल्टीवार यांना दोन निवडणूक झाल्यानंतरही भाजपाला १४ मते मिळणार अशी आशा होती. परंतु निवडणुकीच्या निकाल लागताच सर्वांना धक्का बसला. राजू येल्टीवार यांना ११ व नरेंद्ररेड्डी बोदकुरवार यांना ७ मते मिळाली व येल्टीवार हे विजयी झाले.

निवडणुकीत नरेंद्ररेड्डी बोदकुरवार यांचा पराभव झाल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून ही जागा बोदकुरवार यांच्या ताब्यात होती. महाविकास आघाडीचे राजू येल्टीवार यांचे लोकांप्रती प्रेम, त्यांचे कार्य व त्यांचा मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांना ही जागा खेचून आणण्यात यश प्राप्त केले.

येल्टीवार यांची पक्षाकरिता तसेच गोरगरीब जनतेकरिता धावपळ, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणे हा त्यांचा स्वभावगुण आहे, ज्याचे फळ त्यांना मिळाले. निवडणूक माजी आमदार वामनराव कासावार आणि विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली.

प्रकाश कासावार, राजू कासावार, प्रवीण कासावार, भूमारेड्डी बाजनलावार, प्रकाश म्याकलवार, संदीप बुरेवार, नीलेश येल्टीवार, सुनील ढाले, हरिदास गुर्जलवार, राहुल दांडेकर, संतोष माहुरे, चंद्रकांत घुगुल, सतीश आदेवार, विनोद उप्परवार, संदीप विचू यांचे विशेष सहकार्य लाभले.

निवडणुकीचा निकाल जाहीर होताच झरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुलाल उधळून व फटाके फोडून टाकळी, सातपेली, सुरदापूर, दिग्रस ,पाटण, खरबडा, झरी, झमकोला, माथार्जुन, मुकूटबन, खातेरा, कोसारा व अर्धवन येथील जालंदर गोपवार, मोहन बुरेवार, प्रवीण लक्षट्टीवार,

नरेश रजनलवार, आकाश गडमवार, वामन बाडलवार, अशोकरेड्डी सुरकुंटवार, जितू सातपेल्लीवार, शेखर बोनगीरवार, महेश सिद्दमवार, प्रवीण गंद्रतवार, निखिल चौधरी, श्रीकांत अनमूलवार, संतोष कोहळे, जगदीश कुमरे, संतोष जंगीलवार, रवी कायतवार, केशव नाकले, भूमरेड्डी येनपोतुलवार, मनोज अडपावार, रुपेश द्यागलवार, बंडू भोयर, विजय कडू, सचिन टाले, विनायक भेडोडकर, चेतन म्याकलवार यांनी विजय साजरा केला.

हेदेखील वाचा

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महाविकास आघाडीची बाजी

हेदेखील वाचा

घोन्सा येथे गोठ्याला भीषण आग, 4-5 लाखांचे नुकसान

Leave A Reply

Your email address will not be published.