आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये विविध पदासाठी भरती सुरू

सेल्स, सर्विस, मार्केटिंग इ. साठी अर्ज करण्याचे आवाहन

0

विवेक तोटेवार, वणी: वणीतील आझाद इलेक्ट्रॉनिक्स येथे विविध पदासाठी भरती सुरू आहे. यात सेल्स विभाग, मार्केटिंग विभाग, ग्राहक सर्विस व ऑफिस कामासाठी विविध पदे रिक्त आहेत. या जागेसाठी महिला आणि पुरुष दोघांनाही अर्ज करता येणार आहे.

सध्या कोरोनामुळे अनेकांचे रोजगार आणि नोकरी गेल्या आहेत. अनेकांवर बेकारीची कु-हाड कोसळली आहे. मात्र या काळातही वणीतील मार्केट रोड, माहेर कापड केंद्र समोरील आझाद इलेक्ट्रॉनिक्स येथे नोकरीसाठी विविध जागा निघाल्या आहेत. यात महिला व पुरुष दोघांनी अर्ज करता येणार आहे. तसेच यात वयाची अट नाही.

आझाद इलेक्ट्रॉनिक्स हे वणीतील एक अल्पावधीत नावारुपास आलेले एक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसचे प्रतिष्ठान आहे. सेल्स, सर्विस आणि ग्राहक सर्विस तसेच ऑफिस कामासाठी इच्छुक असणा-या व्यक्तींनी लवकरात लवकर अर्ज करावे असे आवाहन संचालकांतर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी मार्केट रोडवरील शिवाजी चौक, माहेर कापड केंद्रासमोरील आझाद इलेक्ट्रॉनिक्स व शाम टॉकिज जवळील प्रतिष्ठानात भेट द्यावी असे आवाहन आझाद इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: 07239225038 7249107005

Leave A Reply

Your email address will not be published.