सुशील ओझा,झरी: जामनी येथे महिन्याभरापासून सुरु असलेल्या पहाटेच्या काकड आरतीची भजनाद्वारे सांगता झाली. कोजागिरी पौर्णिमेपासून या आरतीला सुरुवात झाली. रोज पहाटे 5 वाजता ह.भ.प.घुलारामजी धुमने यांच्या घरून काकड आरती काढणे व हनुमानजीच्या मंदिरातून येऊन तुळशी मातेची पूजा-आरती करणे, असा नित्यक्रम महिनाभर सुरु होता..
कार्तिक पौर्णिमेच्या पहाटे आरतीला प्रारंभ झाला. गावातील हनुमान मंदिर,आई माऊली देवस्थान,महाकाली देवस्थान, जगन्नाथबाबा मठ येथे भजनाद्वारे आरती व पूजा करण्यात आली. नंतर काला व महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन आरतीची सांगता करण्यात आली.
यामध्ये गावातील प्रशांत महाराज भोयर, सुनील गुरनुले, विनोद डोहे, बाळू भोयर, लोकेश डोहे, निखिल वनकर, केशव उठलावार, प्रशांत मंचलवार, सोपान सोनुले, सुमित लेनगुळे, बालीताई लेनगुळे, लक्ष्मीबाई मुके, वंदना अंकतवार यांनी सहभाग घेतला.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा