डोर्लीत झाला हनुमान मंदिराचा लोकार्पण सोहळा

डॉ.लोढा यांच्या पुढाकारातून झाले मंदिराचे काम

2

नागेश रायपुरे, मारेगाव: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.महेंद्र लोढा यांच्या पुढाकारातून आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून तालुक्यातील डोर्ली येथील हनुमान मंदिर देवस्थानचे काम पूर्ण झाले. सोमवारी 30 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमेच्या पर्वावर डॉ. लोढा आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मंदिराचे लोकार्पण झाले.

तालुक्यातील डोर्ली येथे गावालगत एक जुने हनुमान मंदिर होते. वर्षापूर्वी डॉ. लोढा हे डोर्ली येथे आले असता त्यांचे लक्ष दुरावस्थेत असलेल्या मंदिरावर गेले. या विषयावर त्यांनी ग्रामस्थांसोबत चर्चा केली. डॉ.लोढा यांनी मंदिराच्या जीर्णद्वार करून देण्याचे आश्वासन दिले.

आश्वासनानुसार मंदिराचे बांधकाम मार्च महिन्यापासून सुरू केले. विशेष म्हणजे या मंदिराचे काम करण्यासाठी गावातील लहानमोठयानी सर्वांनीच श्रमदान केले. गावात डॉ. लोढा यांच्या पुढाकारातून आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून हनुमान मंदिर देवस्थानाची वास्तू निर्माण झाली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कार्तिक पौर्णिमेच्या पर्वावर या मंदिराचा लोकार्पण सोहळा डॉ. लोढा यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. आरोग्य, सामाजिक आणि राजकीय कार्यात डॉ. लोढा सदैव अग्रेसर असतात. अनेक गावांतील रस्ते, वीज, पाणी आणि अन्य समस्यांवर त्यांनी भरीव कामगिरी केली. आपल्या समाजकार्यातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अंकुश माफूर, डॉ. मत्ते, डॉ. हेडाऊ, डॉ. नईम, डॉ. पद्मावार, डॉ. कुमनवार, सूरज कावळे, मोहन शेंडे, गुरुदेव कोटरंगे, विठल कावळे, सुधाकर लोनबले, विजू मत्ते, राहुल शेंडे, सुनील वाढई, शंकर शेंडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

हेदेखील वाचा

आज कोरोनाचे 7 रुग्ण, शहरात रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ

 

हेदेखील वाचा

मुकुटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेंटच्या वैदेहीने केली कमाल

 

 

2 Comments
  1. […] डोर्लीत झाला हनुमान मंदिराचा लोकार्प… […]

  2. […] डोर्लीत झाला हनुमान मंदिराचा लोकार्प… […]

Leave A Reply

Your email address will not be published.