कान्हाळगावच्या शेतकऱ्याने फिरविला प-हाटीत ट्रॅक्टर
पीक आलंच नाही, बियाणे कंपनीने घात केल्याचा आरोप
ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील कान्हाळगाव येथील एका शेतकऱ्याने आपल्या चार एकर कपाशीची लागवड असलेल्या शेतात कपाशीला फळधारणा न झाल्याने उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवून संपूर्ण कपाशीचे पीक नष्ट केले. शनिवारी त्यांनी नैराश्यातून हे पाऊल उचललं. बियाणे कंपनीने घात केल्याने पिकांचं नुकसान झाल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.
सूर्यकांत नानाजी चिकटे यांनी आपल्या चार एकर शेतात अंकुर (सुवर्णा) या वाणाचे दोन पॉकेट व टोटल (अल्पगिरी) या वाणाचे चार पॉकेट कपाशीची लागवड गेली. प-हाटीची वाढ मोठ्या प्रमाणात झाली. परंतु त्या वाणाच्या कपासीला बोंडे कंपणीच्या आश्वासणा नुसार आलीच नाही. तसंच कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणात झाला. अखेर त्यांनी वैतागून पीक नष्ट करण्याचा निर्णय घेतला. बियाण्याच्या फसव्या दाव्यामुळे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी वणी बहुगुणीला दिली.
शासनस्तरावर आजपर्यंत शेतकऱ्यांना बोंडअळी व इतर नुकसानीची मदत मिळाली नाही. त्यामुळे शासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असुन, विरोधक मात्र शेतक-यांना बोंडअळीच्या प्रादुर्भामुळे झालेले नुकसान भरून निघण्यासाठी मदत मिळावी म्हणून निवेदनावर निवेदन देऊन प्रसिद्धी मिळवताना दिसत आहे.
तालुक्यातील शेतकरी यावर्षी विषबाधा, कर्जमाफीच्या भुलभुलैया, बोंडअळीच्या कचाट्यात सापडून सुद्धा गेंड्याच्या कातडीचे शासन व विरोधक शेतक-यांच्या या समस्येकडे दुर्लक्ष करुन वेळ मारून नेण्याचं काम करताना दिसत आहे. बियाणे कंपनीच्या वाणाला जर फळधारणा होत नसेल तर बियाणे कंपनीवर शासनाने गुन्हा दाखल करुन शेतक-यांची नुकसान भरपाई करावी, अशी मागणी कान्हाळगाव येथील शेतकरी सूर्यकांत नानाजी चिकटे यांनी केली आहे.
खाली क्लिक करून पाहा संपूर्ण व्हिडीओ….