खापरी येथील युवकावर धारदार शस्त्राने हल्ला

0

झरी, (सुशील ओझा): झरी तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खापरी येथील युवकावर काही अज्ञात व्यक्तींनी धारदार तिक्ष्ण शस्त्राने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयन्त केला. यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भेंडाळा येथील मनोज कर्नू आत्राम वय २८ वर्ष हा ३० मार्च रोजी सायंकाळी साडे सहा वाजता दरम्यान शौचास गेला होता. खूप वेळ होऊनही तो घरी परत आला नाही. अचानक त्याच मार्गाने काही महिला येत असताना मनोज रक्ताच्या थारोळ्यात जिल्हा परिषद शाळेच्या मागे आढळला. सदर महिला जखमी मनोजच्या घरी जाऊन सांगितल्यावरून त्याची बहीण व जावई सह गावकरी घटनास्थळी पोहचले असता जखमीच्या पोटावर, मानेवर, छातीवर, कमरेवर धारदार शास्त्राचे १० ते १२ जागेवर वार करून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मनोजवर झरी येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र परिस्थिती गंभीर असल्याने यवतमाळ येथे हलविण्यात आले. सध्या जखमीची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देऊनही पोलीस घटनेचे गांभीर्य न घेता जखमीचे बयान नोंद घेतले नाही. ज्यामुळे पोलिसांप्रती रोष निर्माण झाला होता.

जखमी मनोज यांचे एक महिनापूर्वी साखरपुडा झाला होता. तर २६ एप्रिलला त्याचे लग्न आहे. सदर घटनेबाबत गावात वेगवेगळे चर्चा सुरु असून याबाबत घरच्या लोकांची तक्रार किंवा मेडिकल रिपोर्ट आले नसल्याने गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती असून जखमीच्या डीडी नंतर गुन्हा दाखल करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.