कारमध्ये अपहरण करून आदिवासी तरुणीवर अत्याचार

अज्ञात आरोपीविरुद्द वणी पो.स्टे. मध्ये गुन्हा दाखल

0

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथील एका आदिवासी तरुणीचे कारमध्ये अपहरण करून बलात्कार केल्याची खळबळजनक आणि तितकीच संतापजनक घटना मंगळवारी रात्री 8.50 च्या सुमारास घडली. पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन वणी पो.स्टे. मध्ये अज्ञात आरोपी विरुद्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. तर अत्याचार पीडित तरुणीला मेडिकलसाठी यवतमाळ येथे पाठविण्यात आले आहे.

पीडिताने नोंदविलेल्या तक्रारीनुसार ती वणी येथील एका खासगी दवाखान्यात काम करते. ड्यूटी आटपून ती पायदळ घराकडे निघाली असता महाराष्ट्र बँक चौकात एका पांढर्‍या रंगाची टाटा इंडिका (MH 29 2280) मागून आली. कार चालक ज्याचे अंदाजे वय 35 त्याने तिच्या जवळ गाडी थांबवून तिला सुगम हॉस्पिटलचा पत्ता विचारला. पीडिताने त्याला हॉस्पिटलला जाण्याचा मार्ग सांगितला. कारचालकाने मी चंद्र्पूरचा आहे मला रस्ता माहीत नाही, जर तुम्ही त्याच मार्गाने जात असल्यास मला हॉस्पिटल दाखवा अशी विनंती केली व तरुणीला गाडीत बसविले.

पीडित तरुणी कारमध्ये मागच्या सीटवर बसताच चालकांनी गाडीचे सर्व काच बंद करून गेट ऑटोलॉक केले व कार सपाट्याने साईमंदिर चौकातून नांदेपेरा मार्गे बायपास ते मारेगावच्या दिशेने नेली. तरुणीने चालत्या गाडीत ओरडाओरड केली मात्र काच बंद असल्यामुळे व गेट लॉक असल्यामुळे ती बाहेर पडू शकली नाही.

प्रातिनिधिक फोटो

वणी यवतमाळ मार्गावर तब्बल 10 किमी पुढे गेल्यावर आरोपी कार चालकांनी रस्त्याच्या बाजूने गाडी लावून मागच्या सीटवर येऊन तरुणीला मारून टाकण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. व तिचा मोबाइल हिसकून घेतला. त्यानंतर कार चालकांनी रात्री 9.20 च्या सुमारास पीडित तरुणीला परत बायपास असताना नांदेपेरा रोड रेल्वे क्रॉसिंगजवळ येऊन सोडले व आलेल्या मार्गाने परत पळून गेला.

घटना अशी आली उघडकीस…
पीडित तरुणी रडत रडत रस्त्यावर जात असताना त्या मार्गाने ये जा करणा-या नागरिकांचे तिच्यावर लक्ष गेले. त्यांनी तिला रडण्याचे कारण विचारले. तेव्हा पीडितांनी सर्व हकीकत सांगितली. ही हकिकत ऐकल्यावर नागरिकांच्या पायाखालची वाळू सरकली. उपस्थित नागरिकांनी त्वरीत याबाबत पोलीस स्टेशनला फोन करून माहिती दिली.

अत्याचार पीडिताच्या तक्रारीवरुण पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्द भादंवि कलम 366, 376(1) व 506 अन्वये गुन्हा दाखल करून पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी यवतमाळ येथे पाठविले आहे. पीडितेनी सांगितल्या प्रमाणे घटना मध्ये वापरण्यात आलेली टाटा इंडिका कार क्रं. MH 29 2280 चा शोध पोलीस घेत आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक दिगांबर जाधव करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.