मारेगाव पोलिसांची कोंबडबाजारावर धाड

6 आरोपी आणि जवळपास 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

1

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील कुंभापासून नजीक असलेल्या बड्डा पोड जगल शिवारात नाल्याच्या काठावर सुरू असलेल्या कोंबडबाजारावर मारेगाव पोलिसांनी धाड टाकली. यात 6 आरोपींसह 4 जिवंत कोंबड्या व मोटर सायकल असा एकूण 1,82,2150 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Podar School 2025

रोशन नामदेव महाजन (27) रा.कुंभा, विकास हरिदास खिरटकर (32)रा.पिपळापूर ता.पांढरकवडा, किशोर अरुण काळे (32) रा.कुंभा,गुलाबराव मंथु मडावी (40)रा.श्रीरामपुर, जगदीश दत्तू पारखी (32) रा.पिपळापूर ता.पांढरकवडा, अरुण दादाजी रामपूरे (42)रा.खेकडवाई असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्राप्त माहितीनुसार शिवणाला, कुंभानजीक बड्डा जगलं शिवारातील नाल्याच्या काठावर कोंबड बाजार भरत असल्याची माहिती मारेगाव पोलीस स्टेशनचे पो. निरीक्षक जगदीश मंडलवार यांना मिळाली. दिनांक 24 नोव्हेंबर सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान योग्य सापळा रचून त्यांनी कोंबडबाजारावर धाड टाकली.

यात 4 जिवंत कोंबडे व 7 मोटरसायकल किमत 1,80,000/- असा एकूण 1,82,2150/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करून वरील सहाही आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 कलम 12 B अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

 

Leave A Reply

Your email address will not be published.