सास-याला काम सांगितल्याने मजुरला काठीने बेदम मारहाण

मारकुंडा जावई आणि सास-याविरोधात गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: कापूस वेचणीसाठी अनेक मजूर दुरदुरून वणी, मारेगाव, झरी तालुक्यात आले आहे. हे मजूर शेतातच राहून मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. असाच उमरखेड तालुक्यातून मारेगाव तालुक्यात मजुरीसाठी आलेल्या एका शेतमजुराला केवळ मजूर असून काम संगितल्याने सासरा व जावयाद्वारा बेदम मारहाण करण्यात आली. सदर घटना 9 जानेवारी रोजी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथे घडली.

सविस्तर वृत्त असे की, दयाराम परशुराम हनवते (30) हा उमरखेड तालुक्यातील जवराळा येथील रहिवासी आहे. तो मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका परिसरात काही मजुरांससह कापूस वेचणीसाठी आला आहे. तो एका शेतातील बंड्यात राहतो. यांच्या सोबत इतरही मजूर कापूस वेचणीसाठी आलेले आहेत.

9 जानेवारी रोजी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास दयाराम याने मजूर बबनराव लक्ष्मण सोनटक्के (50) रा. उरनुर जि. आदीलाबाद यांना सामान आणले नाही का? म्हणून विचारणा केली. मात्र हे ऐकताच त्याचा जावई किरण कांबळे (35) रा. पुसद हा चिडला. याने माझ्या सासऱ्याला काम सांगतो का? अशी विचारणा करीत दयारामच्या कानशिलात लावली.

त्याचवेळी बबनराव गोठ्यातून लाकडी दांडा घेऊन आला व दयारामच्या डोक्यावर व कपाळावर दांड्याने मारहाण केली. मारहाण करतेवेळी जावई किरण याने दयाराम याला पकडून ठेवले. नंतर तेथेच राहणारे दयाराम यांचे मेव्हणे, सासू व आई यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविले.

या झटपटीत फिर्यादी दयारम याचे डोके फुटले. त्याने मारेगाव ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून मारेगाव ठाण्यात आरोपी जावई सास-यविरोधात कलम 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

सुपरहिरो सिनेमा हनुमान शुक्रवारपासून सुजाता थिएटरमध्ये

Comments are closed.