म्हैसदोडका येथील शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

मारेगाव तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच

विवेक तोटेवार, वणी: मारेगाव तालुक्यात आणखी एक आत्महत्येची घटना उघडकीस आली. तात्याजी नारायण बोथले (42) असे मृतकाचे नाव असून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ते म्हैसदोडका येथील रहिवासी होते. ते अल्पभूधारक आहे. कुटुंबातील व्यक्ती शेतात काम करायला गेल्यावर तात्यांनी राहत्या घरात नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. संध्याकाळी त्याचे कुटुंबीय घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. घटना उघडकीस येताच मारेगाव पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. मारेगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मृतकाच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी, आई आणि मोठा आप्त परिवार आहे. घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

Comments are closed.