तलावात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

येनक येथील घटना

0 447

वि. मा. ताजने, वणी: तालुक्यातील येनक येथे तलावात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. सदर घटना दि. ११ शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घडली. साक्षात संजय आत्राम (१६) असे मृतकाचे नाव आहे. तो शिंदोला येथील आदर्श उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावीत शिकत होता.

शुक्रवारी दुपारी गावातील सार्वजनिक दुर्गा विसर्जन पार पडले. त्यानंतर गावातील काही मुले गावालगतच्या तलावात पोहायला गेली. त्यांच्यासोबत साक्षात पोहायला होता. पोहताना तो गाळात फसला. इतर मुलांनी त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तो गाळात फसल्यामुळे त्याला बाहेर काढणे अशक्य झाले. घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. मृतकाचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मृतकाच्या मागे आई, वडील, एक बहीण आहे.

Comments
Loading...