झरी तालुक्यातील मटका जुगारावर एलसीबी पथकाचे धाडसत्र

'वणी बहुगुणी' इम्पॅक्ट: शिबला, झरी व माथार्जुन येथील मटका अडयावरील 8 आरोपी अटकेत

0

सुशील ओझा, झरी: यवतमाळ येथील एलसीबी पथकाचे नवनियुक्त पोलीस निरीक्ष परदेशी यांनी स्वत: आपल्या पथकातील 22 कर्मचारी घेऊन झरी तालुक्यातील शिबला, माथार्जुन व झरी येथे 13 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजेपासून धाडसत्राला सुरूवात केली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. यात एकूण 8 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत पाटण, शिबला, झरी व माथार्जुन येथे खुलेआम पट्टी द्वारे व मोबाईलद्वारा मटका जुगार सुरू होता. याबाबत ‘वणी बहुगुणी’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून पाठपुरावा केला होता. त्याच अनुषंगाने ही कार्यवाही झाली.

संध्याकाळी सुरू झालेल्या कारवाईमुळे इतर मटका चालकांना माहिती मिळाली. त्यामुळे एलसीबी पथक पाटण येथे पोहचेपर्यंत येथील मटका बहाद्दर मोबाईल बंद करून पसार झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर होणारी कार्यवाही राहिली. पाटण व मुकुटवन येथील मटका बहाद्दर एलसीबीच्या निशाण्यावर आहे. अटक करण्यात आलेले आठही आरोपी पाटण पोलीस स्टेशनच्या कोठडीत होते.

अटक करण्यात आलेले आरोपी अनिल शर्मा, संजय बीजगूनवार, इतर 6 अशा एकूण आठ लोकांवर कार्यवाही करण्यात आली. यात 2 दुचाकी सह रोख रक्कम जप्त करण्यात असल्याची माहिती बाहेरून मिळाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी व जप्त केलेली रक्कम व इतर माहितीची विचारणा पाटण पोलीस स्टेशनला केली असता सदर तपास एलसीबी कडे असून आम्ही माहिती देऊ शकत नाही असे उत्तर मिळाले.

माहिती देण्यास टाळाटाळ का?
एलसीबी पथकातील ज्यांनी कार्यवाही केलेले कर्मचारी गजानन डोंगरे यांना केलेल्या कार्यवाहीची माहिती विचारली असता वरिष्ठ अधीकारी यांना विचारून सांगतो असे उत्तर दिले. मटका जुगारावर धाड टाकून पकडण्यात आले. आरोपीचा पीसीआर मागितला जातो. त्यांना रात्रभर कोठडीत ठेवले जाते, दुचाकी व रोख रक्कम जप्त केली जाते व दुसऱ्या दिवशी आरोपींना न्यायालयात हजर केले जाते. या प्रकऱणी एलसीबी किंवा पाटण पोलिसांना माहिती देण्यास अडचण काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे कुठे माशी तर शिंकली नाही ना ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

हे देखील वाचा:

नुकतेच MBBS डॉक्टर झालेल्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

वागदरा येथे कोंबडबाजारावर पोलिसांची धाड

Leave A Reply

Your email address will not be published.