एलसीबी पथक येणार असल्याची माहिती कुणी दिली?

खुलेआम सुरू असलेले धंदे दुपारपासून झाले बंद, पोलीस व एलसीबी खात्यातील तो खबरी कोण?

0

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मुकुटबन, अडेगाव, खातेरा, गणेशपूर, डोंगरगाव, तेजापूर, बोपापूर या गावांत अनेकजण खुलेआम अवैध दारूविक्री करीत आहे. तर खातेरा ,कोठोडा, गडेघाट व परसोडा घाटावरून दररोज 100 ते 200 पेटी दारुची तस्करी चंद्रपूर जिल्ह्यात केली जात आहे.

दारू तस्करी मुकुटबन व पुरड येथून केली जात आहे. धाब्यावर ग्राहकांना बसवून बार सारखी सुविधा दिल्या जात आहे. वरील गावांतील दारूविक्रेते व दारू तस्करांशी काही पोलीस कर्मचाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याने हे धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या आदेशाला न जुमानता हे कर्मचारी अवैध धंद्यांना खुली मुभा देत आहे.

माध्यमांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यामुळे यांची दाखल घेत यवतमाळ येथील एलसीबीच्या पथकांनी 12 मे रोज सायंकाळी मुकुटबन व अडेगाव येथे छापे मारले अनेकांच्या घराची झडती घेतली. एक धाब्यावरसुद्धा छापा मारला परंतु काहीच मिळाले नसल्याची माहिती देण्यात आली. परंतु एका ठिकावरील छाप्याबाबत वेगवेगळी चर्चा ऐकायला मिळत आहे.

एलसीबीचे पथक 12 मेला यवतमाळवरून निघाल्याची माहिती अवैध दारूविक्री करणाऱ्यांना कुणी दिली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण 12 मेच्या सकाळी 11 वाजेपर्यंत सर्व धंदेवाल्यांकडून बिनधास्त दारूविक्री सुरू असताना अचानक सर्व अवैध विक्रेत्यांनी दारूविक्री बंद करून एकही बाटली घरात ठेवली नाही.

मोठ्या प्रमाणात वरील गावांतीलसुद्धा कुणाहीकडे दारुची बाटली न मिळणे म्हणजे माशी कुठेतरी शिंकली असा संशय बळावला आहे. दुपारी एक वाजता नंतर मुकुटबन ठाण्यातील कर्मचारी किंवा एलसीबी मधील कुणीतरी कर्मचाऱ्यांनी ही माहिती अवैध धंदेवल्यापर्यंत पोहचविल्याची खमंग चर्चा सुरू असून त्या गद्दार कर्मचाऱ्याला शोधणेसुद्धा जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या पुढे आव्हान आहे.

दररोज अवैध दारुची विक्री 11 वाजेपासून तर रात्रीपर्यंत खुलेआम चालतो हे लहान मुलापासून सर्वांनाच माहीत असताना एलसीबी पथकांना हे अवैध दारू विक्रेते का मिळाले नाही. कुणाच्या सांगण्यावरून धंदेवल्यानी दारूविक्री बंद करून संपूर्ण साठा लपविला हे एक कोडेच आहे.

यावरून सिद्ध होते की अवैध दारू विक्री करणारे व चंद्रपूर जिल्यात तस्करी करणारे यांच्यासोबत पोलीस विभागाचे अर्थपूर्ण सबंध आहे. तरी मुकुटबन ठाण्यातील व एलसीबी पथकातील कर्मचाऱ्यांचे (सिडीआर) कॉल डिटेल्स काढून खात्यात राहून गद्दारी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फ करण्याची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी करावी अशी मागणी होत आहे

हेदेखील वाचा

विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या

हेदेखील वाचा

मारेगावात उद्या रक्तदान शिबीर

हेदेखील वाचा

वणीमध्ये आलाये पाण्याच्या टाकीचा डॉक्टर

Leave A Reply

Your email address will not be published.