अवैध दारूविक्रेत्याला लिंगटीवासीयांनी शिकवला धडा

गावात प्रवेश करताच देशी दारूसह पकडले रंगेहात

0

सुशील ओझा, झरी: गावात विक्रीसाठी अवैधरित्या दारूचा स्टॉक आणणा-या एका इसमास गावक-यांनी रंगेहात पकडले. सोमवारी रात्रीच्या सुमारास लिंगटी गावात ही घडली. आरोपी कनकय्या रामास्वामी गोटपर्टीवार (50) असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून देशी दारूचे 119 पव्वे व दुचाकी गावक-यांनी जप्त केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून आरोपींकडून 66 हजार 188 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लिंगटी गावात अवैधरित्या दारूची विक्री सुरू आहे. याबाबत गावक-यांनी पोलिसांना माहिती दिली होती. मात्र कारवाई होत नव्हती. अखेर गावक-यांनी स्वत:च दारू पकडण्याचे ठरवले. दरम्यान सोमवारी दिनांक 21 जून रोजी रात्री गावातील कनकय्या रामास्वामी गोटपर्टीवार (50) हा दारूचा स्टॉक घेऊन येणार असल्याची माहिती गावक-यांनी मिळाली. त्यावरून गावकरी एकत्र आले. कनकय्या दुचाकीने दारू घेऊन गावात येताच गावक-यांनी त्याला रोखले व त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी दारूचे 119 पव्वे आढळून आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

गावक-यांनी याची माहिती तातडीने पाटण पोलीस स्टेशनच्या ठाणेदार संगिता हेलांडे यांना दिली. त्यांनी त्वरित पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे यांच्यासह काही कर्मचारी घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याची पॅशन प्रो ही दुचाकी (MH29 AV6513) जप्त केली.

आरोपी कनकय्या याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमच्या कलम 65 ई अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार संगीता हेलोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश मोरे करीत करीत आहे. दरम्यान गावक-यांनी अवैध दारुविक्रीबाबत कळवून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन ठाणेदार यांनी केले.

हे देखील वाचा:

सर्वात कमी किमतीत शेतीच्या कुंपणासाठी झटका मशिन उपलब्ध

Leave A Reply

Your email address will not be published.