जितेंद्र कोठारी, वणी : राज्यात गुरुवार 14 सप्टे. रोजी पोळा आणि शुक्रवार 15 सप्टे. रोजी तान्हा पोळा उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. मराठी संस्कृतीच्या या महत्वाच्या सणाला गालबोट लागू नये, याकरिता वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आगामी दोन दिवस दारूबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे निर्देशानुसार वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी पो.स्टे. हद्दीतील सर्व अनुज्ञप्ती धारक दुकानांना याबाबत आदेशित केले आहे.
वणी शहर व ग्रामीण भागात पोळा व तान्हा पोळा सण हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सणाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे यासाठी ठराविक कालावधी करिता महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 142 (2) अन्वये प्रद्दत अधिकारांचा वापर करून हे आदेश देण्यात आले आहे. आदेशानुसार पो.स्टे. हद्दीतील सर्व सी.एल.-3, सी.एल.-2, एफ.एल.-2 तसेच बियर शॉपी दुकाने 14 आणि 15 सप्टेंबर रोजी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या परवानाधारकांविरुद्ध अटी व शर्ती भंगाची कारवाई तसेच अनुज्ञप्ती कायम स्वरुपी रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येईल. याची सर्व अनुज्ञप्ती धारकांनी नोंद घ्यावी. असा इशारा पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
Comments are closed.