नागेश रायपुरे,मारेगाव: शहरातील एका हार्डवेअर व्यावसायिकाने दुकानाचे अर्धे शटर उघडून दुकान चालू ठेवल्या प्रकरणी, दुकानदारास 50 हजार रुपयांच्या दंडासह दुकानाला सील ठोकल्याची धडक कारवाई मारेगाव प्रशासनाने केली आहे. व्यावसायिकाला दुकान उघडे ठेवणे चांगलेच महागात पडले आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रादुर्भाव रोखण्यासाठी मा.जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी “ब्रेक द चेन” अंतर्गत जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश पारीत केला.
यात 9 ते 15 में पर्यंत अत्यावश्यक दुकाने वगळून सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिला.आदेशाची अंमलबजावणी करत मारेगाव नगर पंचायत प्रशासनाने आदेशाच्या नियमांचे पालन न केल्यास दुकान चालू ठेवल्यास 50 हजार रुपयांचा दंड ठोकण्याचे जाहीर करण्यात आले होते.
दरम्यान शहरात आंबेडकर चौक परिसरातील एका हार्डवेअर व्यावसायिकाणे आदेशाला न जुमानता, आपले दुकान चालू ठेवले असता यात महसूल विभाग,नगर पंचायत विभाग व पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दुकानावर धाड टाकून गोरंटीवार या हार्डवेअर व्यावसायिकवर 50 हजार रुपयाच्या दंड व दुकानाला सील ठोकले आहे. या कारवाई मुळे मार्केटलाईनमधील काही दुकानदारांना चांगलाच धडा बसला आहे.
ही कारवाई पो.नि.जगदीश मंडलवार,पो.उप.नि.अमोल चौधरी, महसूल प्रशासनाचे तलाठी संतोष राठोड, नगर पंचायतीचे नोडल अधिकारी तथा अभियंता निखिल चव्हाण यांनी पार पाडली.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा