पोलिस जमादार मधुकर उके यांचे अपघाती निधन

मारेगाव-करणवाडी रस्त्यावरील शनिवारची घटना

0 1,120

वि. मा. ताजने, मारेगाव: येथील पोलीस ठाण्यातील जमादार मधुकर नीळकंठ उके (51) यांचे शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अपघाती निधन झाले. मारेगाव ते करणवाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीला टँकरने धडक मारली. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

त्यांच्या मागे आई पत्नी तीन मुली मुलगा आणि आप्त परिवार आहे. यांचे मूळ गाव वणी तालुक्यातील मेंढोली आहे. विशेष म्हणजे त्यांनी अतिदुर्गम नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात बारा वर्ष सेवा केली. अतिशय कर्तव्यतत्पर म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Loading...