“‘मातीत’ श्रद्धा रुजते, पीओपीत नाही”… मातीच्या मूर्तींची मॉडर्न स्टोरी

ऑनलाईन मातीचे गणपती पुणे-मुंबईला उपलब्ध करून देणाऱ्या वणीतल्या कलावंताचा प्रवास

0

सुनील इंदुवामन ठाकरे: तो ऑनलाईन गणपतीच्या मूर्ती विकतो. पर्यारणाचं त्याला भान आहे. मूर्तीसोबत तो एक रोप मोफत देतो. मूर्तीचं विसर्जन घरीच करावं आणि त्यावर ‘बाप्पांची’ आठवण म्हणून त्यात ते रोप लावावं आणि वाढवावं हा त्याचा आग्रह. तो तीन वर्षांपासून अव्याहतपणे हेच कार्य करीत आहे. प्रत्येक श्रद्धावंताला घरबसल्या किंवा त्याच्या परिसरात ऑनलाईन बुकिंग करून सहज मातीची गणपती मूर्ती मिळवण्यासाठी तो तीन वर्षांपासून कार्यरत आहे. पहिल्या वर्षी या प्रयोगाला अनेक कष्ट पडलेत. आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. अनेकांनी त्याची थट्टा केली. पण यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील इंजि. मनीष सुधाकर बुरडकर याने आपले प्रयत्न सुरूच ठेवले. पुण्यात त्याचं हे कार्य मोठ्या जोमानं सुरू आहे.

इंजि. मनीष बुरडकर

प्रत्येक गणेशोत्सव पर्यावरणपोषक राहील यासाठी प्रयत्नरत त्याच्या या प्रयोगाची एक नवी सुरुवात ‘मंगलसुधा डॉट कॉम’ या वेबसाईटने आणि ‘मंगलसुधा’ या अॅपने झाली. रितेश साखरकर व जवळच्या मित्रांनी त्याला या कार्यात मदत केली. ‘मंगलसुधा क्रिएशन्स’चे व्यवस्थापकीय संचालक मनीष सुधाकर बुरडकर आणि क्रिएटीव्ह हेड पराग बुरडकर हे पर्यावरणपूरक श्रद्धा जोपासण्याच्या कार्यात यशस्वी झालेत. त्यांच्या मातीच्या गणपती मूर्तींना सर्वत्र प्रचंड मागणी होत आहे. पर्यावरणाला प्रचंड हानीकारक अशा प्लास्टर ऑफ पॅरीसच्या विरोधात एक पर्यावरणपोषक व अत्यंत उत्तम पर्याय देणाऱ्या इंजि. मनीषचा प्रवास नक्कीच चित्तवेधक आहे.

भाद्रपदात गणपतीचं थाटात आगमन होतं. दहा दिवस गणरायाच्या घरातील वास्तव्याने वातावरण मंगलमय असतं. दहा दिवसानंतर विसर्जन होतं. मग रिकामा महिरप त्या दहा दिवसांच्या केवळ आठवणीत रमतो. गणरायाच्या या आनंदसोहळ्याला चिरंतन व चिरंजीव करण्याचा प्रयत्न सिव्हील इंजिनिअर असलेल्या मनीष या युवकाने केला. दहा दिवसांचा हा गणेशोस्तव सगळ्यांच्या चीरकाल व पर्यावरणपूरक कसा स्मरणात राहील, यासाठी मनीष आजही प्रयोगशील आहे.

मूर्तिकार सुधाकर बुरडकर

गेल्या एक-दोन दशकांपासून मातीच्या गणपतींऐवजी प्लास्टर ऑफ पॅरीसचे गणपती मोठ्याा प्रमाणात सर्वत्र आलेत. पूर्वी तालुक्याच्या ठिकाणी किंवा ग्रामीण भागात मातीचेच गणपती गणेशोत्सवात मिळायचे. या मातीच्या मूर्ती तयार करायला प्रचंड परिश्रम लागतात. वेळ भरपूर लागतो. त्या मूर्ती अनेक प्रक्रियांतून जातात. महागड्या रंगांचा मोठ्याा प्रमाणात वापर होतो. त्या तुलनेत पीओपीच्या मूर्ती या लवकर तयार होतात. साच्यातच तयार कराव्या लागत असल्याने विशेष परिश्रमदेखील लागत नाहीत. साठवयालादेखील विशेष कष्ट पडत नाहीत.

पुणे, मुंबई, नागपूरसारख्या मेट्रो सिटीज पासून अलीकडे तालुकास्तरावरदेखील पीओपी मूर्तींचे स्तोम माजले आहे. यांचं विसर्जन नदी, तलावात केलं जातं. पीओपी विरघळत नाही. त्यावरील रंगांमुळे पाणी प्रदूषित होतं. मोठ्याा शहरांत पर्यावरणप्रेमी हे अशा मातीच्या गणपतींचा आग्रह धरतात. मात्र हे लवकर उपलब्ध होत नाही. विश्वासाने कुठे मिळतात हेदेखील अनेकांना माहीत नसतं. जी जाण ठेवून इंजि. मनीष सुधाकर बुरडकर याने मातीचे गणपती ऑनलाईन बूक करून सहज मिळवून देण्यासाठी काही वर्षांपूर्वी प्रयत्न सुरू केले. गेल्या तीन वर्षांपासून मातीच्या गणपती मूर्तींची मागणी आता ऑनलाईन पूर्ण करण्यात मनीषला यश मिळाले. ‘मंगलसुधा डॉट कॉम’ www.mangalsudha.com या वेबसाईटने आणि प्लेस्टोअरवर उपलब्ध असलेल्या ‘मंगलसुधा’ mangalsudha या अॅपने श्रद्धा आणि पर्यावरण यांचा समतोल राखत गणेशोत्सव अधिक मंगल होत आहे.

मूर्तिकार पंकज बुरडकर

त्याचं लहानपण ‘मातीतच’ गेलं. मातीत खेळता खेळता तो मोठा झाला. मनीषचे वडील सुधाकर विदर्भातील वणी परिसरातील ख्यातनाम मूर्तिकार व शिल्पकार आहेत. त्यामुळे मनीषचे बालपण या सर्व प्रक्रियांतून गेलं. अगदी अनिच्छेने वडलांना लहानपणी मदत करायला मनीषने सुरुवात केली. पुढे त्याचा यातील इंटरेस्ट डेव्हलप व्हायला लागला. हा पारंपरिक वारसा त्याला चालवावा असे वाटू लागले. थोड्याा अधिक मूल्य असलेल्या मातीच्या मूर्तींना स्पर्धा देण्यासाठी पीओपीच्या मूर्ती आल्यात. तालुक्याच्या ठिकाणी मिळणाऱ्या मातीच्या मूर्ती अगदी मोठमोठ्याा शहरांमध्ये कशा उपलब्ध करून देता येईल यासाठी त्याचे विचारचक्र फिरत होते. त्याने तीन वर्षांपूर्वी प्रत्यक्ष कार्याला आरंभ केला आणि यशस्वीदेखील झाला.

‘मंगलसुधा डॉट कॉम’ या वेबसाईटवर आणि प्लेस्टोअरवर उपलब्ध असलेल्या ‘मंगलसुधा’ या अॅपवर आता पुणे शहरासह ठिकठिकाणांहून मातीच्या गणपती मूर्तींचं बुकिंग सुरू झालं. मनीष म्हणतो की, सामूहिक प्रयत्न आहेत. अनेक मूर्ती त्याच्या स्टुडिओत तयार होतात. शिरपूर येथील कलावंतदेखील मातीच्या मूर्ती देतात. यातून अनेकांना उत्तम रोजगार मिळत आहे. मातीच्या मूर्तींमुळे पर्यावरणाचे संरक्षणदेखील होत आहे. खऱ्या कलावंतांच्या पारंपरिक कलेला प्रोत्साहनदेखील मिळत आहे. निसर्ग, पर्यावरण आणि श्रद्धा यांना लीलया जपणाऱ्या आणि इतरांना प्रोत्साहन देणाऱ्या या कलावंताला सदिच्छा!

सुनील इंदुवामन ठाकरे

8623053787 &
9049337606

Mangalsudha Address, REGISTERED OFFICE: THEUR ROAD , GAT NO 597 , PAWAR VASTI , KOLWADI , TAL – HAVELI , PUNE ( 412110 )
BRANCH OFFICE: SUTARPURA , NEAR SHITLA MATA TEMPLE , TAL – WANI , DIST – YAVATMAL ( 445 304 )
Phone: +917709677086
Email: [email protected]

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.