शिरपूर येथील धर्मेंद्र काकडे यांचा अपघाती मृत्यू       

मार्डी रस्त्यावर दुचाकीला अपघात

0

विलास ताजने, मारेगाव: मार्डी कडे जात असताना किन्हाळा गावाजवळ वणी तालुक्यातील शिरपूर येथील एका युवकाचा मार्डी रस्त्यावर दुचाकी अपघातात मृत्यू झाला. तर एकजण किरकोळ जखमी झाला. ही घटना रविवारला दुपारच्या दरम्यान घडली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

धर्मेंद्र दत्तूजी काकडे वय (३२) असे मृतकाचे नाव आहे. शिरपूर येथील धर्मेंद्र काकडे आणि रवींद्र किसन मोहूर्ले हे दोघे दुचाकीने पिसगाव येथे रविंद्रच्या बहिणीकडे भेटायला गेले. बहिणीने जेवणाची व्यवस्था केली. परंतु रवींद्रचे जावई मोहन जंगटे वय (४०) रा. पिसगाव आणि धर्मेंद्र हे  दोघे आता लवकरच मार्डीला जाऊन येतो म्हणून दुचाकीने निघाले.

धर्मेंद्र हा दुचाकी चालवित होता. दुचाकी अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडाला दुचाकी धडकून अपघात घडला. उत्तरीय तपासणीनंतर शिरपूर येथे मृतकावर अंत्यसंस्कार करण्यात आले

Leave A Reply

Your email address will not be published.