भारनियमन बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन

भारनियमन प्रकरणी मनसे आक्रमक, अभियंत्यांना निवेदन

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात होत असलेल्या भारनियमनावर मनसे आक्रमक झाली आहे. सध्या भारनियमनामुळे सर्वसामान्यांसह शेतकरी राजा ही हवालदिल झाला आहे. सध्या सुरू असलेले भारनियमन कायमस्वरूपी बंद करावेअन्यथा महाराष्ट नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून ‘मनसे’ स्टाइलने आंदोलन छेडेल असा इशारा मनसेने दिला आहे. या आशयाचे निवेदन मारेगाव येथील महावितरण विभागाचे उपविभागीय अभियंता यांना देण्यात आले आहे.

सध्या कपाशीचे उत्पादन तोंडावर आहे सोबतच भाजीपाल्याच्या उत्पादनासाठी सिंचनाची गरज आहे. परंतु भारनियमनामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. शेतकरी सर्वच बाजूने हतबल झाला आहे. दिवाळी तोंडावर आली आहे. वर्षातुन एकदा येणाऱ्या या महत्वाच्या सणालाही दिवाळी अंधारातच जाईल की काय असा अशी भीती सर्वसामान्यांना आहे. एकीकडे महावितरण भारनियमन करते, तर दुसरीकडे मात्र देयकांची पठाणी वसूली करत आहे, असा आरोप मनसेने केला आहे.

सणासुदीच्या  दिवसात तसेच शेतकऱ्यांना सिंचनासाठी कुठलाही त्रास होउ नये यासाठी येणाऱ्या काळात तालुक्यातील भारनियमन पूर्ण बंद करावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाइलने आंदोलन करेल, असा इशारा मनसेने निवेदनातून दिला आहे. यावेळी मनसेचे शहर प्रमुख श्रीकांत सांबजवार, रमेश कोल्हे, राजू खडसे, राजू आस्कर, जगन येरमे, कवडु जुमनाके, यांचे सह मनसेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.