कॉलेज अॅडमिशनसाठी जाताना विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू, अन्य जखमी

मारेगावजवळ अपघात, एक ठार तीन गंभीर

0

रोहण आदेवार, मारेगावः गुरूवारी मारेगाव येथे दोन दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात एक जण ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

Podar School 2025

केळापूर तालुक्यातील मुंजाळा या गावातील इयत्ता बारावीचा विद्यार्थी रविसागर राजेंद्र मेश्राम (18) हा मारेगाव येथे कॉलेजच्या अॅडमिशनसाठी सकाळीच घरून निघाला. त्याने एम. एच. 29, 3234 क्रमांकाची हिरो होंडा स्प्लेंडर गाडी घेतली. रविसागरसोबत त्याचा मित्र अक्षय नांदूरकर गाडीवर सोबत होता. बोटोणी येथील सुरेश त्र्यंबक आत्राम (20) व प्रकाश राजू घाटे (26) हे त्यांच्या गाडीने येत होते. यांची मारेगाव जवळील विनायक कोटेक्स जिनिंग जवळ धडक बसली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या अपघातात रविसागर हा ठार झाला. तर अक्षय, सुरेश व प्रकाश जखमी झालेत. गंभीर अक्षयला पुढील उपचारांकरिता रेफर करण्यात आले. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. या प्रकरणी रविसागरचे वडील राजेंद्र मेश्राम यांनी मारेगाव पोलिस ठाण्यात जबानी रिपोर्ट दिला.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.