मारेगाव तालुक्याला पावसाने झोडपले… कोसारा पूल पाण्याखाली

अनेक गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

भास्कर राऊत, मारेगाव: गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे मारेगाव तालुक्याला चांगलेच झोडपले. शेतकऱ्यांच्या शेतीला तलावाचे स्वरूप आले आहे. तर कोसारा पुलावरून सात फूट पाणी असून चंद्रपूर जिल्ह्याचा संपर्क तुटलेला आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेलेली आहे. तर कित्येक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याची माहिती आहे. प्रशासन अलर्ट असून नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले जात आहे.

Podar School 2025

दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील नाले, विहिरी तुंबल्या आहेत. तालुक्यात वाहणारे नाले तसेच वर्धा नदी दुथडी भरून वाहत आहे. चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्याला जोडणारा कोसारा पूल पाण्याखाली आला आहे. या पुलावरून सात फूट एवढे पाणी वाहत आहे. पावसामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. मारेगाव ते मार्डी या 11 किमी अंतरा मध्ये येत असलेल्या पिसगावच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे तास भर वाहतूक ठप्प होती. तालुक्यातील मार्डा येथील डॅमवरूनही पाणी ओसंडून वाहत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सतत सुरु असलेल्या पावसाने शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहेत. हातात आलेली पिके जाते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची शेती कामे दिवसभरासाठी खोळबली होती. शेती कामे बंद असल्यामुळे शेतमजुरांना मजुरीवर पाणी सोडावे लागले. तालुक्यातील नदीसोबतच नालेही भरून वाहत आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहावे असे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे.

हे देखील वाचा: 

Comments are closed.