मारेगाव तालुक्यात निशांत चव्हाण, झरी तालुक्यात एंजल पुनवटकर अव्वल
यंदा दहावीचा निकाल घसरला
ज्योतिबा पोटे, सुशील ओझा: यंदा मारेगाव आणि झरी या दोन्ही तालुक्याचा निकाल घसरला आहे. दहावीच्या परीक्षेत मारेगाव तालुक्याचा सरासरी निकाल ५३.७०% लागला आहे. मारेगाव तालुक्यात विद्यानिकेत इंग्लिश मिडयम स्कुलच्या निशांत चव्हाणने ८८.४०% गुण घेऊन तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला, तर याच शाळेचा यश मोघे ८६% घेऊन तालुक्यातुन द्वितीय आला तर आदर्श हायस्कुलची सेमी इंग्लिशची विद्यार्थिनी श्वेतांबर बाबाराव झाडे ८५. ८१% गुण घेउन तालुक्यातुन तिसरी आली.
