कुंभा येथे विहिरीत उडी घेऊन विवाहित तरुणाची आत्महत्या

मारेगाव तालुक्यात आत्महत्येचे सत्र काही केल्या थांबेना

1

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील एका 32 वर्षीय विवाहित तरुणाने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना कुंभा येथे घडली. सदर घटना 9 जून च्या रात्री 8 वाजता दरम्यान घडली. प्रवीण सुनील कुमरे असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित तरुणाचे नाव आहे. मारेगाव तालुक्यात गेल्या वर्षभरापासून सततच्या आत्महत्या होत आहे. आत्महत्येचे सत्र काही केल्या थांबेना. मात्र याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे ना लोकप्रतिनिधींचे.

प्राप्त माहिती नुसार कुंभा येथील रहिवासी असलेले मृतक प्रवीण कुमरे हा गेल्या काही दिवसा पासून आर्थिक विवेचनात होता. तसेच त्याला दारूच्या व्यसनाने ग्रासले होते. 9 जून च्या रात्री 8 वाजता घरा शेजारी असलेल्या सार्वजनिक विहिरीत त्याने उडी घेऊन जीवनयात्रा संपविली.

आत्महत्याचे नेमके कारण कळू शकले नाही. मृतक प्रवीणच्या पश्चात पत्नी, 2 वर्षाचा मुलगा, आई, वडील, बहिणी असा मोठा आप्तपरिवार आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

हे देखील वाचा:

वणीसह ग्रामीण भागातही आज दमदार पाऊस

Leave A Reply

Your email address will not be published.