विष प्राशन करून महिलेची आत्महत्या

मारेगाव तालुक्यातील घोडदरा येथील घटना

0

नागेश रायपुरे, मारेगाव : एका विवाहित महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मारेगाव तालुक्यातील घोडदरा येथे दुपारी दोनच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. वंदना गजानन धनवे (50) असे विष घेऊन आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

घरी कुणी नसताना वंदनाने विषारी औषध प्राशन केले. दरम्यान कुटुंबातील लोकांना ही बाब लक्षात येताच वंदनाला ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे भरती केले. उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषीत केले. वृत्त लिहेपर्यंत आत्महत्याचे कारण कळू शकले नाही. मृतक वंदनामागे पती व तीन मुली आहेत. ऐन तान्ह्या पोळ्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेने घोडदरा येथील वातावरण शोकाकुल झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.