वणीत माकप आणि किसानसभेचे रास्ता रोको आंदोलन

शेतकरी विरोधी कृषी कायदा रद्द करा व अन्य मागण्यांना घेऊन आंदोलन

0

निकेश जिलठे, वणी:  दिनांक 26 नोव्हेंबररोजी संविधानदिन साजरा झाला. शहरात कामगारांचा राष्ट्रव्यापी संप झाला. तसेच शेतकऱ्यांचे राष्ट्रव्यापी “डेरा डालो, घेरा डालो ” हे आंदोलनही झाले. तहसील कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसानसभेच्यावतीने शेतकऱ्यांच्या ज्वलंत मागण्यांना घेऊन कॉ शंकरराव दानव, कॉ. कुमार मोहरमपुरी व कॉ. दिलीप परचाके यांच्या नेतृत्वात निदर्शने व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात विविध मागण्याही झाल्यात. त्यात असे म्हटले आहे की,  केंद्र सरकारने एका मागे एक भांडवलदारी, उदारीकरण व जागतिकीकरणाची धोरणे घेत देशातील सामान्य जनतेच्या अधिकारावर गदा आणीत त्यांना गुलामीत टाकणारे कायदे तयार करून राबविणे सुरू केले आहे. प्रचंड आंदोलनातून तयार झालेल्या कामगार कायद्यांमध्ये बदल करीत कामगारांचे अधिकार कमी केलेत.

दुसरीकडे कृषी कायदा करून शेतकऱ्यांना भांडवलदारांच्या घशात घालून त्यांना गुलाम करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याचप्रमाणे नवीन शैक्षणिक धोरण आणले. त्यामध्ये गरिबांपासून, दलित,आदिवासी बहुजनांपासून शिक्षण हिरावून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. ह्या सरकारच्या जनविरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी देशव्यापी संपात भाग घेत माकप व किसानसभेने रास्ता रोको केला.

या आंदोलनात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपयांची मदत करावी. पीकविमा योजनेची रास्त अमलबजावणी करून शेतकऱ्यांना फायदेशीर पीक योजना तयार करावी. शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना आधारभावाने कायदेशीर संरक्षण द्यावे. कर्जमुक्ती योजना राबवावी. शेतकरी विरोधी कायदा रद्द करावा. नवीन वीज बिल मागे घ्यावे.

वनजमीन, महसूल जमीन, तसेच देवस्थान इनामी जमीन कसत असणाऱ्यांचा नावे करावी, आदिवासींचे पेंडिंग असलेले दावे निकालात काढावे. पारंपरिक वनजमीन कसणाऱ्यांना या कायद्यातील तीन पिढ्यांची असलेली अट रद्द करावी. कोरोना लॉकडाउन काळातील जनतेचे व शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे. ह्या मागण्यांसह तहसीलदार यांच्या मार्फत पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात शंकरराव दानव, कुमार मोहरमपुरी, दिलीप परचाके, नंदू बोबडे, विप्लव तेलतुंबडे, रामभाऊ जिड्डेवार, सुधाकर सोनटक्के, कवडू चांदेकर, किसनराव मोहूर्ले, वंदना गेडाम तसेच आशा कर्मचारी संघटनेच्या प्रीती करमनकर त्याच प्रमाणे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या ज्योती येरेकर यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाही सक्रिय सहभाग घेतला.

हेदेखील वाचा

अल्पवयीन मुलीला पळवून नेणा-या मजनुला ठोकल्या बेड्या

हेदेखील वाचा

आठ शतकांपासूनच संत नामदेव महाराज ‘ग्लोबल’च आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.