वैद्यकीय प्रवेशात ओबिसींना २७% आरक्षण देण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी
विवेक तोटावार, वणी: राष्ट्रीय कोट्यातील वैद्यकीय प्रवेशासाठी ओबीसींना नियमानुसार २७% आरक्षण मिळावे यासाठी संभाजी ब्रिगेड यवतमाळ जिल्हा(पूर्व)ने उपविभागीय अधिकारी वणी मार्फत देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना निवेदन दिले. सरकारने वैद्यकीय क्षेत्रातील आरक्षण कमी करून ते 2 टक्कांवर आणले आहे.
ओबीसीवर होत असलेला अन्याय सहन करणार नसल्याचं निवेदनात नमूद केलं असून ओबीसींच्या हक्कासाठी संभाजी ब्रिगेड तत्पर आहे, त्यासाठी शासनाने ओबीसी समूहाचा विचार करुन वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी २७% आरक्षण देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
निवेदन देते वेळी अजय पांडुरंगजी धोबे, (जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड यवतमाळ), विवेक ठाकरे (तालुकाध्यक्ष), शकंर निब्रड (जिल्हा सचिव), प्रशांत बोबडे (तालुकाध्यक्ष, झरी), अॅड. अमोल टोंगे, दत्ता डोहे, पांडुरंग मोडक, विजय कडुकर, अॅड. शेखर वऱ्हाटे, हेमंत गौरकार, गणेश मत्ते व इतर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते.