नोटबंदी, प्लास्टिक बंदीप्रमाणेच जिल्ह्यात दारूबंदी करा

झरी तालुका स्वामिनी संघटनेची मागणी

0

सुशील ओझा, झरी: देशात नोटबंदी व प्लास्टिक बंदी करून चांगला निर्णय घेतला. त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करावी अशी मागणी स्वामिनी संघटनेने केली आहे. मंगळवारी याबाबत तहसिलदारांना संघटनेद्वारा निवेदन देण्यात आले. गोरगरीब कुटुंब व अनेकांचे संसार दारूमुळे उद्धवस्त झाले आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे.

दारूच्या व्यसनाने गुन्ह्यात वाढ, खून, चोरी, आत्महत्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. तर तरुण युवक व्यसनाधीन झाले आहेत. १ एप्रिल २०१५ पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केला तेव्हापासून वणीतून  दारू तस्करी, अपघात व गुन्हेगारीत वाढ झाली आहे.

स्वामिनी संघटनेने गेल्या चार वर्षांपासून विविध आंदोलन, उपोषण करून सरकारचे लक्ष वेधले; परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संघटनेने निवेदनातून केला आहे.

देशात नोटबंदी व प्लास्टिक बंदी करून चांगला निर्णय घेतला. त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय घ्यावा असे निवेदन तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांना स्वामीनी संघटनेचे तालुका संयोजक महेश मुके, राजू भुतमवार, शेख रहीम, हणमंतु पडलवार, अमोल संगमावर, गजानन द्यावर्तीवार, मोहन बुरेवार, निखील दशरथवार यांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.