पाटण पोलीस स्टेशनमध्ये बकरी ईद निमित्त दक्षता कमिटीची बैठक
पोलीस ठाणे परिसरात करण्यात आले वृक्षारोपण
सुशील ओझा, झरी: पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात मुस्लिम बांधवांनी कोरोनाचे नियम पळत शांततेत बकरी ईद साजरी करावी असे आवाहन ठाणेदार संगीता हेलोंडे यांनी केले. याबाबत मुस्लिम कमिटीच्या पदाधिकारी, सदस्य तसेच मजिद, इदगाह व मौलाना यांची बैठक घेण्यात आली होती.
बकरी ईद निमित्त 19 जुलै रोज दौअरी 12 वाजता पाटण पोलीस स्टेशन मध्ये शांतता कमिटीची व पोलीस पाटील यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत ठाणेदार हेलोंडे यांनी सर्व मुस्लिम बांधवाना कोणतेही अनुचित प्रकार घडू नये ईद सणाला गालबोट लागू नये याची दक्षता घेण्याचे आवाहन केले.
30 ते 40 पोलीस पाटील ,शांतता कमिटीचे सदस्य व मुस्लिम बांधव उपस्थित होते. बैठक संपताच पोलीस स्टेशनच्या आवारात वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी ठाणेदार संगीता हेलोंडे, पोलिस उपनिरीक्षक गणेश मोरे यांच्यासह पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
हे देखील वाचा:
गुरुकुल कॉन्व्हेंटच्या 14 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा अधिक गुण