अल्पवयीन कॉलेज विद्यार्थिनीला फूस लावून पळविले

आईच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ति विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी : शहरालगत एका गावातून अल्पवयीन कॉलेज विद्यार्थिनीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार वणी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार पीडित कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. पीडितेची 17 वर्षाची मुलगी वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात 12वी मध्ये शिक्षण घेत आहे. शनीवार 10 सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे सकाळी 6 वाजता आईवडील मजुरी कामावर निघुन गेले. त्यावेळी अल्पवयीन कुमारिका घरात एकटीच होती. सायंकाळी कामावरून परत आले असता आई वडिलांना मुलगी घरात दिसून आली नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आजूबाजूला शोध घेऊन विचारपूस केली असता ती मिळून आली नाही. कोणीतरी अज्ञात इसमाने मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशयावरून मुलीच्या आईने रात्री 10 वाजता वणी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. घरुन जाताना अल्पवयीन मुलीने घरात ठेवलेले महिला बचत गटाचे 20 हजार रुपये, स्वतःचे कपडे आणि इतर कागदपत्रे घेऊन गेल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. घरुन निघताना मुलगी कथ्या रंगाचा कुर्ता व सिमेंट रंगाचा पॅन्ट घालून आहे.पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्द कलम 363 अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा

Comments are closed.