चिमुरडीवर अत्याचार करणारा अखेर जेरबंद

आरोपीच्या तेलंगणातून आवळल्या मुसक्या

0

तालुका प्रतिनिधी, मारेगाव: चिमुरडीवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीला मारेगाव पोलिसांनी अटक केली. मारेगावचे ठाणेदार दिलीप वडगावकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. सोमवारी ठाणेदारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही मीहिती देण्यात आली.

मारेगाव तालुक्यातील बोटोणी गोदामपोड येथे एका चार वर्षीय चिमुरडीवर अनैसर्गीक अत्याचार केल्याची घटना रविवारी उघडकीस आली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. उटना उघडकीस होताच आरोपी फरार झाला होता. अखेर आरोपीला तेलंगणातील अदिलाबाद जिल्ह्यातील कमलापूर सितागुडी हतनूर येथून अटक करण्यात आली.

पोलीस आरोपीचा कसून शोध घेत होते. अखेर पोलिसांना वागदरा येथील एका व्यक्तीने आरोपी तेलंगणात असल्याची माहिती दिली. यावरून पोलिसांनी त्याला सोबत घेतले. आरोपी कमलापूर येथील एका धाब्यावर होता. त्याच्या लगेच मुसक्या आवळून पोलिसांनी त्याला मारेगावात आणले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

(हे पण वाचा: चिमुरडीवर अनैसर्गीक अत्याचार, बोटोणी गोदामपोड येथील घटना)

ही कारवाई ठाणेदार दिलीप वडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार लक्ष्मण गोडेकर, आनंद अलचेवार आणि चमू यांनी पार पाडली. सध्या पीडित मुलीवर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.