लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

आरोपीला अटक, ऍट्रोसिटीनुसार गुन्हा दाखल

0

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील बोर्डा येथे राहणाऱ्या एका तरुणावर एका अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी तरुणाने मुलीला फुस लावून पळवून नेले होते. अखेर आज बुधवारी पोलिसांनी या दोघांना अटक केल्यानंतर तरुण हा लग्नाचे आमिष दाखवून शोषण करत असल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर ऍट्रोसिटीही दाखल केली आहे.

सविस्तर वृत्त असे की आरोपी निखिल रामकीसन जाधव (28) हा बोर्डा येथील रहिवाशी असून तो शेतमजुरीचे काम करतो. पीडिता त्याच गावातील रहिवाशी आहे. 12 व्या वर्गात शिक्षण घेत आहे. निखिलचे पीडिताशी ओळख होती. पुढे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. निखिलने पीडिताला लग्नाचे आमिष दाखवून पळून जाण्यासाठी हट्ट केला. सोमवारी दिनांक 16 सप्टेंबर रोजी पीडिता व निखिल दोघे ही गावातून पळून गेले.

पीडिताच्या वडिलांना जेव्हा मुलगी घरात दिसली नाही तेव्हा त्यांनी पोलिसात मुलगी हरविल्याची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार कलम 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रार दाखल करताच जमादार जगदीश बोरणारे यांनी ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला.

काल दिनांक 17 सप्टेंबरला रात्री पोलिसांना एक जोडपं पांढरकवडा जवळील पारवा गावात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी लगेच पारवा गावात जाऊन जोडप्याला अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता. आरोपीने लैंगिक शोषणासाठी लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचे पीडितेने सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी निखीलवर कलम 376, 4, 6 बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार व ऍक्ट्रॉसिटी कलम 3 (1)( w) (1), (2), 3(2) (v) नुसार गुन्हा दाखल केला. आरोपीला बुधावरी विजय वानखेडे व इकबाल शेख न्यायालयात घेऊन गेले. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नाईक करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.