मनसेची निवडणूक रणनिती ठरली; अर्जासाठी 6 नोव्हेंबर मुदत

पूर्वीच्या विजयांचा आत्मविश्वास, जनसंपर्काच्या बळावर तयारी

बहुगुणी डेस्क, वणी: वणी – नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नुकतेच एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करून आगामी सर्व निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढण्याचा निर्धार व्यक्त केला. मनसे नेते राजू उंबरकर यांनी आगामी निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात दिनांक 6 नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन केले.

पक्षनेते राजू उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक स्थानिक मध्यवर्ती कार्यालयात उत्साहाच्या वातावरणात पार पडली. वणी नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून, मतदारसंघातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि वणी नगरपालिकेचे आरक्षणही जाहीर झाले आहे.

या बदललेल्या राजकीय समीकरणांवर भाष्य करताना राजू उंबरकर यांनी सांगितले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे सर्वच जागांवर सक्षम आणि जनसंपर्क असलेले उमेदवार उपलब्ध आहेत. त्यामुळे मनसे या निवडणुका संपूर्ण ताकदीनिशी लढणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

राजकीय विश्लेषकांच्या मते, या निवडणुका मनसेसाठी सोयीस्कर ठरू शकतात. यापूर्वी वणी नगरपालिकेची सत्ता मनसेकडे होती, तसेच तालुक्यातील एक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जागाही मनसेने जिंकली होती. या अनुभवाचा आणि सातत्याने असलेल्या जनसंपर्काचा फायदा मनसेला मिळण्याची शक्यता आहे. राजू उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात विविध सामाजिक आणि लोककल्याणकारी कामे करण्यात आली असून, त्याचा सकारात्मक परिणाम उमेदवारांच्या विजयात दिसून येईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

बैठकीस मनसेचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये महिला सेनेच्या राज्य उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्या अलका टेकाम, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष रमेश पेचे, महिला सेना जिल्हाध्यक्ष अर्चना बोदाडकर, जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, महेश हातगावकर, वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, मारेगाव तालुकाध्यक्ष रूपेश ढोके, अरुणा थेरे, गोविंदराव थेरे, शहराध्यक्ष अंकुश बोढे, माजी नगराध्यक्षा प्रिया लभाणे, माजी आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके, माजी नगरसेवक प्रकाश पिंपळकर,

खरेदी विक्री संघाचे संचालक विनोद कुचनकर, परशुराम खंडाळकर, दिलीप मस्के, विलन बोदाडकर, चांद बहादे, राकेश शंकावार, हरी कालेकार, शंकर पिंपळकर, मयूर गेडाम, लक्की सोमकुंवर, सूरज नागोसे, उदय खिरटकर, वैशाली तायडे, शबनम शेख, ज्योती मेश्राम, मेघा तांबेकर, राहुल पानघाटे, काशीनाथ कुमरे, प्रफुल चुक्कलवार यांचा समावेश होता.

Comments are closed.