शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू
3 ते 10 नोव्हेंबर दरम्यान जनसंपर्क कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन
पुरुषोत्तम नवघरे,वणी: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने वणी तालुक्यातील कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीसाठी सज्जतेचा इशारा दिला आहे. आमदार संजय देरकर व जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रमुख संतोष कुचनकर यांनी शिवसैनिकांना निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
ग्रामीण भागात सत्ताधारी पक्षाविरोधात असंतोष वाढत असून आमदार संजय देरकर यांच्या कार्यशैलीबाबत जनतेत समाधानाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांसाठी पक्षातर्फे उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक शिवसैनिकांनी आपले नाव अनिवार्यपणे नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिवसेना जनसंपर्क कार्यालय, वरोरा रोड, वणी येथे 3 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून अर्ज घेणे व सादर करणे आवश्यक आहे.
अर्जात उमेदवाराने स्वतःबद्दल सविस्तर माहिती नमूद करणे आवश्यक आहे. त्यात राजकीय अनुभव, सामाजिक कार्य, राबविलेली आंदोलने, सार्वजनिक योगदान, स्थानिक जनतेशी असलेला संपर्क तसेच सोशल मीडिया उपस्थिती (Facebook, Instagram, X (Twitter), YouTube इ.) यांचा समावेश असावा.
राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राची प्रत अनिवार्यपणे जोडावी. अर्जासोबत पासपोर्ट आकाराचा छायाचित्र व सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
अधिक माहितीसाठी संतोष कुचनकर (तालुका प्रमुख वणी – 8888455773 / 9823983101), प्रकाश कराड (तालुका संपर्कप्रमुख – 7721087960), राजु इद्दे (तालुका सचिव), संभाशिव मते (तालुका संघटक – 9637412327), रविकांत जयस्वाल (तालुका समन्वयक – 9420023142) यांच्याशी संपर्क साधावा.



Comments are closed.