मोबाईल चोरटा गजाआड, झोपेत खिशातून चोरला होता मोबाईट

चोरीचा मोबाइल विकत घेणा-या दुकानदारावरही गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: एक महिन्यापूर्वी 2 ऑगस्ट रोजी झोपलेल्या व्यक्तीच्या खिशातून मोबाईल चोरणा-या आरोपीला आज अटक केली. सोबतच हा चोरीचा मोबाईल विकत घेणा-या दुकानदारावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2 ऑगस्ट रोजी फिर्यादी देवेश नारायण पालीवाल रा कोसारा ता. झरी हे दुचाकी दुरुस्ती करीता वणीत आले होते. त्यांना चक्कर आल्याने ते रात्री चिखलगाव येथील रेल्वे क्रॉसिंगजवळ झोपी गेले. सकाळी उठल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या खिशातून सॅमसंग कंपनीचा मोबाईल चोरी गेला आहे. त्यांनी वणी पोलिसात याबाबत तक्रार दिली.

पोलिसांनी कलम 379 नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. नंतर गोपनीय माहितीवरून आरोपी अमोल विजय ठावरे (28) रा रामनगर चिखलगाव याला पोलिसांनी आज 22 सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले. त्याला मोबाईल बाबत विचारणा केली असता, सदर चोरीचा मोबाईल हा गुरुनानक मोबाईल या दुकानात विकल्याची माहिती दिली. पोलिसांनी मोबाईल शॉप चे मालक रवी नागदेव यांना याबाबत विचारणा केली. त्यांनी सदर चोरीचा मोबाईल घेतल्याचे स्पष्ट झाले.

त्यांच्यावर कलम 411 नुसार गुन्हा दाखल केला. अमोल यास न्यायलायत हजर केले असता न्यायालयाने त्याला 15 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. घटनेचा तपास हा सहाय्यक फौजदार डोमजी भडिकर करीत होते.

हे देखील वाचा:

आता मारोती टाऊनशिपमध्ये घरफोडी, 1 लाखांचा मुद्देमाल लंपास

धक्कादायक: आणखी एक अल्पवयीन कॉलेज कुमारिका घरुन बेपत्ता

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.