ढाकोरी-बोरी मार्गावर रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलन
सा. बां. विभागाच्या आश्वासना नंतर आंदोलन मागे
तालुका प्रतिनिधी, वणी: चारगाव ते ढाकोरी बोरी मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. परिणामी पावसाच्या दिवसात पाणी साचलेल्या खड्डयांचा अंदाज न आल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मात्र, याकडे बांधकामविभागाचे दुर्लक्ष होत आहे. म्हणून सदर रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी ढाकोरी ते कोरपना मार्गावर दि. 2 गुरुवारला दुपारी परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाला उपविभागीय उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वणी यांनी भेट देऊन सदर रस्ता दुरुस्तीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावती यांना सादर केल्याचे पुरावे सादर केले. प्रस्तावाला मंजुरात मिळताच रस्त्याच्या कामाला सुरुवात करणार असल्याचे सांगितले. आश्वासना नंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
आंदोलनादरम्यान काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनात सरपंच, योगराज बदखल, रवींद्र बदखल, राजेंद्र इद्दे, मिननाथ काकडे, ज्ञानेश्वर ठाकरे, संदीप देवतळे, राजू दुर्गे, विठ्ठल ठाकरे, सतीश मुसळे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
हे देखील वाचा:
Comments are closed.