अपघातानंतरही मेंटेनन्सच्या कामाकडे महावितरण अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

जितेंद्र कोठारी, वणी : पावसाळ्याचे आगमन होऊनही विद्युत विभागाचे मेंटेनन्सच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. महावितरण कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे लाठी गावातील पियूष माहुरे या बालकाला करंट लागून आयुष्यभरासाठी अपंगत्व आले. अपघातानंतर ही लाठी व बेसा गावात विद्युत पुरवठा व मेंटेनन्सचे कामे अद्याप करण्यात आले नाही. महावितरण अधिकाऱ्याच्या वेळकाढू धोरणामुळे त्रस्त लाठी आणि बेसा गावातील नागरिकांनी सोमवार 26 जून रोजी वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर धडक दिली.

समाज सेवक मनोज ढेंगळे यांच्या नेतृत्वात लाठी बेसा गावातील नागरिकांनी नादुरुस्त डिपी दुरुस्त करणे, लोमकळलेले विद्युत तारा ओढणे, वाकलेले व झुकलेले विद्युत पोल सरळ करणे, तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडणे व इतर देखभाल दुरुस्तीचे कामे पूर्ण करणे संबंधी निवेदन दिले. यावेळी मनोज ढेंगळे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता फरकाडे यांना चांगलेच धारेवर धरलं. येत्या सात दिवसात मेंटेनन्सचे कामे पूर्ण न झाल्यास महावितरण कार्यालयाला कुलुप ठोकण्याचा ईशारा गावाकऱ्यानीं दिला. 

निवेदन देताना समाजिक कार्यकर्ता मनोज ढेंगळेसह भवसागर पेटकर, गणेश माहुरे, वसंता डोहे, मनोज लाडे, मोहन गोवारदीपे, राकेश पोटे, महेश देवतले, संकेत गोवारदीपे, सचिन धोंगडे, राधेश्याम हेपट व् इतर गावकरी उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.