दीपक नवले यांना उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार जाहीर

0

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी : येथील जैताई देवस्थान शिक्षण समितीने गेल्या वर्षापासून सुरू केलेला प्राचार्य राम शेवाळकर स्मृती उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार या वर्षी वणी येथील माध्यमिक शिक्षक दीपक नवले यांना प्रदान करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतल्याचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला व सचिव माधव सरपटवार यांनी जाहीर केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पुरस्काराचे स्वरूप 2100 / रूपये रोख , स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. गेल्या वर्षी हा पुरस्कार वैजनाथ खडसे यांना देण्यात आला होता. दीपक नवले हे वरोरा येथील लोकमान्य विद्यालयात गेल्या 20 वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते एक उपक्रमशील शिक्षक असून सामाजिक व शैक्षणिक कार्यात त्यांचे मोठे योगदान आहे. हा पुरस्कार त्यांना 6 एप्रिल रोजी रात्री 7 वाजता नगर वाचनालय सभागृहात समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार  आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.