मुकुटबन ग्रामपंचायतीची कोट्यवधींची जागा अतिक्रमणाच्या विळख्यात

अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाकडे तक्रार

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असलेल्या गट क्रमांक 87 व 15 यात असणा-या कोट्यवधी रुपयांच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित धोरणामुळे गेल्या काही वर्षांपासून या जागेतील सुमारे 80 टक्के जागा बाहेर गावातील लोकांनी हडप केल्याने संताप उसळला आहे. याबाबत प्रशासनाक़डे निवेदनातून तक्रार करण्यात आली आहे.

गट क्रमांक 87  मध्ये ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवर ग्रामपंचायतीला कोणतीही माहिती न देता तसेच परवानगी न घेता काही लोकांनी यावर जनावरांचे गोठे बांधले आहे. या बाहेर गावातील अतिक्रमण धारकांना ग्रामपंचायतीद्वारे सूचनापत्र देऊन समज द्यावी. तसेच शासन नियमानुसार गट नं 87 मधील जागेवर गावातीलच बेघर लोकांना 500 स्क्वेअर फूट जागा नोंदणी करून त्यांच्या सदर जागा त्यांच्या नावे करून द्यावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

गट क्र 15 मधील 33 हजार स्केअर फूट जागा ही ग्रामपंचायतच्या मालकीची जागा ग्रामविकास दृष्टीकोनातून बसस्थानक उद्यान व ग्रंथालयची उभारणी करीता खुली ठेवण्यात आली होती. परंतु गावातील व बाहेर गावातील 15 ते 20 लोकांनी यावर कच्चे व पक्के घर बांधून या जागेवर अतिक्रमण केले आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या मालकीच्या चाळीवर देखील काही लोकांनी अतिक्रमण करून ताबा मिळविला आहे.

याबाबत ग्रामपंचायतने सूचना पत्र दिले होते. परंतु अतिक्रमण धारकांनी सदर चाळ खाली करण्यास नकार देत कोर्टात जाण्याचा इशारा दिला. या अतिक्रमण धारकांनाही पुन्हा सूचना पत्र देऊन ही जागा खाली करावी अशी मागणी करण्यात आली आहे. शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक व्यक्तीला अन्न, वस्त्र, निवारा आवश्यक असताना गावातील बेघर जनतेला आजपर्यंत कोणताही लाभ मिळाला नाही, तर दुसरीकडे अतिक्रमण धारक मात्र अवैधरित्या जमिनी हडपत आहे. असा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

निवेदनावर शंकर लाकडे, विकास मंदावार, गजानन मुके, शोभा गडेवार, छाया गडेवार, रमेश सामजवार, संजय गिरसावळे, विनोद कुमोजवार, रमेश मंदावार, संतोष काल्लूरवार, सुनीता कुंटावार, भास्कर बट्टावार, आकाश परचाके, प्रेमीला कडेलवार, शहनाज शेख, सुभाष शेखबंडीवार, संगीता मंदावार, कविता गोपशेट्टीवार इत्यादी यांच्या सह्या आहेत.

वणी बहुगुणी हे देखील वाचा:

तालुक्यात कोरोनाचा हाहाकार सुरुच, आज 78 पॉजिटिव्ह

मुकुटबन पोलिसांनी पाठलाग करून पकडली 10 पेट्या दारू

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.