तालुक्यात कोरोनाचा हाहाकार सुरुच, आज 78 पॉजिटिव्ह

वणी येथील एका वृद्ध महिलेचा व मारेगाव येथील एका वद्धाचा मृत्यू

0

जब्बार चीनी, वणी: तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या रोज नवनवीन रेकॉर्ड करताना दिसत आहे. आज शुक्रवारी दिनांक 16 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 78 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 31 तर ग्रामीण भागातील 41 रुग्ण आढळले आहे. यात एकट्या शिंदोला येथील 26 रुग्णांचा समावेश आहेत. याशिवाय झऱी तालुक्यातील 3 रुग्ण, मारेगाव तालुक्यातील 2 रुग्ण तर राळेगाव तालुक्यातील एक रुग्ण वणी येथे पॉजिटिव्ह आढळला आहे. आज आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 386 झाली आहे. दरम्यान आज वणी येथील एका 75 वर्षीय वृद्ध महिलेचा व मारेगाव येथील एका 65 वर्षीय वृद्धाचा यवतमाळ येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आज आलेल्या शहरातील 31 रुग्णांमध्ये इंदिरा चौक येथे सर्वाधिक 4 पॉजिटिव्ह आढळून आले. भोईपुरा, विठ्ठलवाडी, भगतसिंग चौक, देशमुखवाडी येथे प्रत्येकी 2 रुग्ण आढळले आहेत. तर खाती चौक, अण्णाभाऊ साठे चौक, लक्ष्मी नगर, रंगनाथ नगर, टागोर चौक, माळीपुरा, दामले फैल, आंबेडकर चौक, तेली फैल, जैन ले आऊट, आनंद नगर, गोरक्षण, सेवानगर, महावीर नगर, ब्राह्मणी फाटा, गुरुनगर, मनिष नगर, ढुमे नगर, जुना कॉटन मार्केट येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला.

ग्रामीण भागात शिंदोला येथे 16, शिंदोला एसीसी येथे 10 रुग्ण आढळून आले. शेलू, दामले ले आऊट चिखलगाव, गणेशपूर, चिखलगाव. येथे प्रत्येकी 2 रुग्ण आढळून आलेत. तर खांदला, नवीन वागदरा, राजूर कॉलरी, नायगाव बुद्रुक, भालर, नांदेपेरा पोहणा, सुंदरनगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. याशिवाय झरी तालुक्यातील 3 रुग्ण, मारेगाव तालुक्यातील 2 रुग्ण व राळेगाव येथील 1 रुग्ण वणी येथे पॉजिटिव्ह आले आहेत.

आज यवतमाळ येथून 264 अहवाल प्राप्त झाले. यात 43 जण पॉजिटिव्ह आलेत. तर आज 133 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 35 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 442 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 710 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आज 22 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली

सध्या तालुक्यात 386 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 71 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 269 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 46 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 2058 रुग्ण आढळून आलेत. यातील 1643 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 29 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

वणी बहुगुणी हे देखील वाचा:

लॉकडाऊनमध्ये मयूर मार्केटिंगतर्फे ऑनलाईन सेवा सुरू

‘त्या’ दरोड्यातील मुख्य आरोपीला राजस्थान येथून अटक

मुकुटबन पोलिसांनी पाठलाग करून पकडली 10 पेट्या दारू

 

Leave A Reply

Your email address will not be published.